Salman Khan Latest News
Salman Khan Latest News Salman Khan Latest News
मनोरंजन

Salman Khan News : सलमान खानला पुन्हा धमकीचा ई-मेल; पोलिसांनी वाढवली घराची सुरक्षा

सकाळ डिजिटल टीम

प्रसिद्ध बॉलिवुड अभिनेता सलमान खानला ईमेलद्वारे धमकी पाठवल्याचा प्रकार समोर आला आहे. या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी सलमानच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली आहे. तसेच वांद्रे पोलिसांनी आयपीसीच्या कलम ५०६(२), १२०(बी) आणि ३४ अंतर्गत गुन्हा नोंदवला. (salman khan received threat on email )

याआधी शनिवारी मुंबई पोलिसांनी अभिनेता सलमान खानच्या कार्यालयात धमकीचे ईमेल पाठवल्याप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि रोहित गर्ग या गुंडांवर गुन्हा दाखल केला आहे.

शनिवारी अभिनेता सलमान खानला धमकीचे ईमेल पाठवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि मोहित गर्ग या गुंडांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. अभिनेता सलमानचे मॅनेजर आणि जवळचे मित्र प्रशांत गुंजाळकर यांनी ही तक्रार केली आहे.

सलमानला हा मेल लॉरेन्स बिश्नोईच्या मुलाखतीनंतर आला आहे, ज्यामध्ये त्याने सलमानला ठार मारण्याची उघडपणे धमकी दिली होती. टीव्ही चॅनलला दिलेल्या या मुलाखतीत लॉरेन्सने सांगितले की, त्याच्या आयुष्याचे एकमेव ध्येय अभिनेत्याला मारणे आहे.

इमेलमध्ये काय म्हटलंय?

वांद्रे पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरनुसार, धमकीचा मेल शनिवारी दुपारी अभिनेत्याच्या कार्यालयाच्या ईमेल आयडीवर पाठवण्यात आला होता. मोहित गर्गच्या आयडीवरून पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे की, “गोल्डी भाई (गोल्डी ब्रार) को बात करनी है तेरे बॉस सलमान से. त्याने मुलाखत (लॉरेन्स बिश्नोई) पाहिली असेलच. कदाचीत बघितली नसेल तर बघायला सांगा. मॅटर क्लोज करायचा असेल तर बोलणे करून द्या, समोरासमोर करायचे असेल तर सांग. आता मी वेळीच माहिती दिली आहे, पुढच्या वेळी फक्त झटकाच बघायला मिळेल.

ईमेल मिळाल्यानंतर गुंजाळकर यांनी वांद्रे पोलिसांशी संपर्क साधला. त्यांच्या तक्रारीवरून बिष्णोई, ब्रार आणि गर्ग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात वांद्रे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, या धमक्यांच्या आधारे सरकारने अलीकडेच सलमानच्या सुरक्षेत वाढ केली आहे. यापूर्वीही तो बिश्नोई टोळीच्या रडारवर होता. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत.

सलमानला अशा धमक्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी गेल्या वर्षी जूनमध्ये अभिनेत्याचे वडील सलीम खान यांना एक पत्र आले होते, ज्यामध्ये सलमानला मूसवालाप्रमाणे मारणार असल्याचे म्हटले होते. त्या प्रकरणी सलमानच्या तक्रारीवरून गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT