Mumbai Police files FIR against actor Zeeshan Qadari 
मनोरंजन

गँग्स ऑफ वासेपूरमधल्या 'डेफिनेटनं' केली दीड कोटींची फसवणूक 

युगंधर ताजणे

मुंबई - गँग्स ऑफ वासेपूर आठवतोय, प्रसिध्द दिग्दर्शक अनुराग कश्यप याचे ते दोन भन्नाट चित्रपट मोठ्या प्रमाणावर हिट झाले होते. एका वेगळ्या प्रकारचा सिनेमा आणि विषयाला अनुरागनं मांडल होत. त्या चित्रपटाच्या दुस-या भागात दाखविण्यात आलेला डेफिनेट हा आता कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. त्यानं तब्बल दीड कोटींची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला असून त्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे.

गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटाचा लेखक आणि त्यात अभिनय करणारा झिशान कादरी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका निर्मात्यानं याप्रकरणी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. झिशाननं वेबसीरीजच्या प्रकरणात दीड कोटींची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. संबंधित निर्माता आणि त्याच्या एका मित्रानं झिशान जी मालिका तयार करणार होता त्यावर कोटी रुपयांची गुंतवूक केली होती. मात्र झिशानने फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

झिशानच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या 420 (फसवणूक) आणि 406 (विश्वासघात करणे) या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार झिशान एक वेबसीरीज तयार करणार होता. मात्र काही कारणास्तव त्याच्या निर्मितीचे काम रखडले. ही मालिका तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करणार होता. तक्रारदारानं सांगितले की, झिशाननं पैसे घेतले मात्र ज्यावेळी द्यायची वेळ आली तेव्हा मात्र त्याने नकार दिला. तो टाळाटाळ करु लागला. 

आम्हा दोघां निर्मात्यांचे पैसे त्याने दिले नाहीत. सारखा तगादा लावल्यानंतर त्याने काही चेक्स दिले होते. पण ते वठले नाही. यावेळी आमची फसवूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर आम्ही आंबोली पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी आता त्याच्यावर गुन्हा दाखल केल्याचे सेठी यांनी सांगितले. झिशान हा अनुरागच्या गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटापासून प्रसिध्दीस आला होता. त्यानेच या चित्रपटाच्या दूस-या भागाचे लेखनही केले होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

Ghat Road Travel: पावसाळ्यात घाटातील प्रवास सुखकर बनवण्यासाठी कोणती काळजी अन् खबरदारी घ्यावी?

Video : ‘एक उडी’... अन् सगळं संपलं! स्टंटबाजी करताना इमारतीवरून पडला मुलगा, थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

SCROLL FOR NEXT