Munawar Faruqui bigg boss 17 winner grand finale  SAKAL
मनोरंजन

Bigg Boss 17 Winner: 'मुनावर फारुकी' ठरला बिग बॉसचा महाविजेता! 'अभिषेक कुमार'ला दिली टक्कर

मुनावर फारूकी बिग बॉस 17 चा महाविजेता ठरलाय

Devendra Jadhav

Bigg Boss 17 Winner News: आज बिग बॉस 17 ची ग्रँड फिनाले पार पडली. सलमान खान होस्ट करत असलेल्या या शोची गेल्या अनेक महिन्यांपासून उत्सुकता आहे. हा शो TRP मध्ये टॉपवर आहे. अखेर बिग बॉस 17 मध्ये मुनावर फारुकीने बाजी मारली आहे. मुनावर फारुकी बिग बॉस 17 चा महाविजेता झालाय. सलमान खानने विजयी स्पर्धक म्हणून मुनावर फारुकीचं नाव जाहीर केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून यंदाच्या सीझनमधील विजयी स्पर्धकाच्या नावाची चाहत्यांना कमालीची उत्सुकता होती.

मुनावर फारुकी घरात सुरुवातीपासून चर्चेत होता. मुनावरचा घरातला वावर आणि प्रत्येक टास्कमध्ये असलेला त्याचा सहभाग कौतुकास्पद होता. मुनावर बिग बॉस 17 मधला टॉप स्पर्धक म्हणून ओळखला जात होता. मुनावरच्या खेळामुळे त्याच्या फॅन फोलॉइंग मध्ये प्रचंड वाढ होत होती. अशातच मुनावर फारुकी विजयी झाल्याने सर्वांना आनंद झालाय.

बिग बॉस 17 मध्ये टॉप 5 मध्ये अभिषेक कुमार, अरुण माशेट्टी, मन्नारा चोप्रा, अंकिता लोखंडे, हे फायनलमध्ये पोहोचले होते. घरातल्या सर्व स्पर्धकांवर मात करत मुनावर फायनल जिंकला आहे. सलमान खानने मुनावरचं अभिनंदन केलं असून त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव झालाय. भारत नव्हे तर जगभरातील चाहते मुनावरवर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

मुनावर विषयी सांगायचे झाल्यास तो सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय असणारा सेलिब्रेटी आहे. इंस्टावर त्याला १० मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी बिग बॉसच्या १७ व्या सीझनचा विनर कोण असणार यात त्याचे नाव सर्वाधिक चर्चेत होते. चाहत्यांची मोठी पसंती त्याच्या नावाला मिळाली होती. अशातच बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये त्याचे नाव विजेता म्हणून घोषित झाल्यानंतर त्याच्यावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

बिग बॉसच्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये मुनावर फारुखी हा सर्वाधिक लोकप्रिय असणारा कंटेस्टंट आहे. इंस्टावरील सर्वाधिक लोकप्रिय म्हणून त्याचे नाव घेतले जात आहे. इंस्टावर त्याला फॉलो करणाऱ्यांची संख्या १०.९ एवढी आहे. त्या प्लॅटफॉर्मवर तो लोकप्रिय आहे. कंगनाच्या रियॅलिटी शो मध्ये देखील तो चांगलाच लोकप्रिय झाला होता. त्यानं त्या शो चे विजेतेपदही मिळवले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT