Munawar Faruqui And Huma Latest News 
मनोरंजन

Jhalak Dikhhla Jaa 11: मुनव्वरनं हुमाची केली टिंगल अभिनेत्रीनंही दिलं जशास तसं उत्तर! 'तू तर...'

मनीषा रानीनं (Manisha Rani) झलक दिखजा चे विजेतेपद मिळवून आपल्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

युगंधर ताजणे

Munawar Faruqui jhalak Dikhhal Jaa 11 : टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध रियॅलिटी शो झलक दिखला जा च्या अकराव्या सीझनचा ग्रँड सीझन नुकताच पार पडला.त्याला बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री हुमा कुरेशी हजर होती. यावेळी बिग बॉसच्या १७ व्या सीझनचा विजेता मुनव्वर देखील उपस्थित होता. या सगळ्यात एका व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मनीषा रानीनं यंदाच्या झलक दिखजा चे विजेतेपद मिळवून आपल्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. बऱ्याच दिवसांपासून झलक दिखला जा ची चर्चा होती. अखेर त्याचा यंदाचा सीझन संपला असून त्यानं चाहत्यांचा निरोप घेतला आहे. या सगळ्यात शेवटच्या एपिसोडमध्ये चर्चा रंगली होती ती हुमा कुरेशी आणि मुनव्वर फारुखीची. त्यानं तिची टिंगल केल्याचे दिसून आले आहे.

मुनव्वरच्या प्रतिक्रियेवर हुमानं देखील त्याचे कान टोचले आहेत. त्याला असभ्य संबोधले आहे. तो व्हिडिओ वेगानं सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. मुनव्वरची कॉमेडी आणि त्याचं त्याबाबतचं टायमिंग हे अनेकांना माहिती आहे. स्टँड अप कॉमेडियनच्या माध्यमातून त्यानं स्वताच्या नावाची वेगळी छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवली आहे.

हुमा आणि हर्ष हे दोघे जण त्यांच्या आगामी एका कॉमेडी शो मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसायंगे मध्ये दिसणार आहे. त्या शो च्या प्रमोशनसाठी ती झलक दिखला जा मध्ये आली होती. यावेळी मुनव्वर देखील त्याच्या हल्की हल्की सी बरसात नावाच्या म्युझिक व्हिडिओच्या प्रमोशनसाठी आला होता. मुनव्वरनं यावेळी झलक दिखल जा ११च्या सेटवरील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केले आहेत.

मुनव्वरनं त्या व्हिडिओमध्ये हुमाला उद्देशून म्हटले आहे की, काय जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन आहे....हुमाला वाटलं तो तिच्या वजनाविषयी बोलतो आहे. ती त्याला धन्यवाद म्हणते. पण तेव्हा मुनव्वर हे क्लिअर करतो की, मी तुमच्या सारख्या बॉलीवूडच्या अभिनेत्रीला टीव्ही शो मध्ये काम करावे लागते आहे याविषयी बोलतो आहे. याविषयी म्हटलं आहे. त्यानंतर हुमानं नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT