'Munna Bhai 3' on shooting startrs? Sanjay Dutt, Arshad Warsi's viral video on internet SAKAL
मनोरंजन

Munnabhai 3: मुन्नाभाई - सर्कीट पुन्हा एकत्र, राजकुमार हिरानींकडून मुन्नाभाई 3 च्या शुटींगला सुरुवात? व्हिडीओ प्रसिद्ध

संजय दत्त - अर्शद वारसी यांच्या मुन्नाभाई 3 च्या शुटींगला सुरुवात झालीय

Devendra Jadhav

'Munna Bhai 3' on shooting startrs?: मुन्नाभाई - सर्कीट कोणाला माहित नसतील असा माणुस आढळणे दुर्मिळ. या दोघांच्या जोडीने बॉलिवूडवर अक्षरशः धुमाकुळ उडवली.

राजकुमार हिरानींच्या मुन्नाभाई एम. बी. बी. एस, आणि लगे रहो मुन्नाभाई या दोन्ही सिनेमांनी बॉलिवूडमध्ये धम्माल आणली. आता राजकुमार हिरानी मुन्नाभाई 3 च्या शुटींगला सुरुवात करणार का? अशी चर्चा आहे. एका व्हिडीओमुळे ही चर्चा सुरु झालीय.

('Munna Bhai 3' on shooting startrs? Sanjay Dutt, Arshad Warsi's viral video on internet)

मुन्नाभाई 3 च्या शुटींगला सुरुवात

संजय दत्त आणि अर्शद वारसी ज्यांनी 2003 मध्ये मुन्ना भाई एमबीबीएस आणि 2006 मध्ये लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटाच्या प्रचंड यशाचा आनंद घेतला. हे दोघे पुन्हा एकत्र आले.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, संजय दत्त त्याच्या मुन्नाभाई अवतारात दिसत होता, चमकदार केशरी रंगाचा शर्ट त्याने परिधान केलाय. त्याच्यासोबत सेटवर राजकुमार हिरानीहीसोबत होता.

बॅकग्राउंडमध्ये मुन्नाभाई टायटल ट्रॅक वाजवला जातोय. संजयला आणताच राजकुमार हिरानी म्हणतात, “अहो, मुन्ना परत आला आहे!” संजय दत्तच्या एंट्रीनंतर काही क्षणांतच अर्शद वारसी त्याच्या भूमिकेत सर्किटमध्ये प्रवेश करतो. तो हसत हसतच संजूबाबाला मिठी मारतो. व्हिडिओमध्ये चाहत्यांना राजकुमार हिरानी 'We Are Back' असं म्हणतो.

मुन्ना भाई M.B.B.S आणि लगे रहो मुन्ना भाई या दोन हिट चित्रपटांनंतर, तिसरा चित्रपट तयार होत असल्याची शक्यता हा व्हिडीओ पाहून निर्माण झालीय.

मुन्नाभाई चले अमेरिका सिनेमाच्या शुटींगला सुरुवात

हा व्हिडीओ पाहून अनेकांना मुन्नाभाई 3 च्या शुटींगला सुरुवात झाली असं वाटत आहे. काही वर्षांपुर्वी लगे रहो मुन्नाभाई सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला. या सिनेमानंतर काही वर्षांनी मुन्नाभाई 3 ची घोषणा झाली. ज्याचं नाव ठेवण्यात आलं मुन्नाभाई चले अमेरिका.

इतकंच नव्हे मुन्नाभाई चले अमेरिका सिनेमाचा छोटासा व्हिडीओ देखील यूट्यूबवर रिलीज झाला होचा. त्यामुळे मुन्नाभाई 3 याच विषयावर आधारीत असणार की काही वेगळा असणार, याचा उलगडा लवकरच होईल.

केवळ मुन्नाभाई 3 नाही तर या सिनेमात संजय - अर्शद पुन्हा एकत्र

सगळेजण मुन्नाभाई 3 च्या अधिकृत घोषणेची वाट पाहत आहेत. पण याशिवाय संजय दत्त आणि अर्शद वारसी ‘वेलकम टू द जंगल’ नावाच्या प्रोजेक्टसाठी पुन्हा एकत्र येणार आहेत.

वेलकम आणि वेलकम 2 चा बहुप्रतिक्षित सिक्वेल वेलकम टू द जंगल मध्ये अक्षय कुमार, परेश रावल, जॅकलीन फर्नांडिस, दिशा पटानी, श्रेयस तळपदे, तुषार कपूर असे कलाकार दिसणार आहेत.

त्यामुळे वेलकम 3 आणि मुन्नाभाई 3 अशा सिनेमांसाठी संजय - अर्शदची जोडी पुन्हा धम्माल आणणार यात शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Politics : संजय पाटील यड्रावकर आणि राजू शेट्टींचे पीए स्वस्तिक पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी, "तुमचा काय संबंध"; नगपरिषदेतच हाय व्होल्टेज ड्रामा

Nagpur Land Survey : नवीन नागपूरसाठी जमिनीच्या संयुक्त मोजणीला सुरुवात; शेतकऱ्यांचे सहकार्य; विविध यंत्रणांचा सहभाग!

Latest Marathi Breaking News Live Update : नागपूरमध्ये काँग्रेसच्या गटबाजीला कंटाळून 221 पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा

Indian Railways Recruitment 2025: भारतीय रेल्वेत ज्युनियर इंजिनिअरच्या पदांसाठी भरती सुरू; येथे वाचा संपूर्ण माहिती

BJP vs Shivsena: २०२९ तयारी? भाजपमधील इनकमींगची दूसरी बाजू काय? शिंदे गटाच्या नेत्यांविरुद्ध ‘स्ट्राँग प्लॅन-B’ तयार?

SCROLL FOR NEXT