Murali Mohapatra Latest News Murali Mohapatra Latest News
मनोरंजन

Murali Mohapatra : स्टेजवर गाणी गाताना गायक मुरली महापात्रा यांचा मृत्यू

मुरली यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे मानले जात आहे

सकाळ डिजिटल टीम

Murali Mohapatra Latest News गायक मुरली महापात्रा यांचे कार्यक्रमादरम्यान निधन झाले. ते दुर्गापूजेच्या कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी गेले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. मुरली यांच्या निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. मुरली हे जयपूरच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक म्हणूनही काम करीत होते हे फार कमी लोकांना माहिती आहे.

ओडिशातील प्रसिद्ध गायक मुरली महापात्रा यांची चांगली फॅन फॉलोइंग मोठी होती. मुरली महापात्रा कोरापूटच्या दुर्गापूजेत असताना अचानक स्टेजवर कोसळले. मुरली महापात्रा यांची प्रकृती ठीक नव्हती. ओडिशातील जयपूर शहरात त्याचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी दूरदूरवरून लोक आले होते. कार्यक्रमात त्यांनी चार गाणी गायली होती. पाचवे गाणे सुरू करण्यापूर्वी ते अचानक स्टेजवर कोसळले.

मुरली यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे मानले जात आहे. मुरली अचानक निघून जाईल, असे कोणालाही वाटले नव्हते. कार्यक्रमाच्या दिवशी ते चाहत्यांच्या मागणीनुसार गाणी म्हणत होता. प्रेक्षकांच्या मागणीनुसार महापात्रा यांनी ज्येष्ठ गायक अक्षय मोहंती यांची गाणी गायली.

केके यांचाही परफॉर्म करताना मृत्यू

अशाच प्रकारे गायक केके यांचाही स्टेजवर परफॉर्म करताना मृत्यू झाला होता. स्टेजवर परफॉर्म करताना केके कोसळल्याने चाहते खूप अस्वस्थ झाले होते. त्यावेळी कोणाला काही समजले नाही. नंतर कळले की सर्वांचे लाडके केके आता या जगात नाही. केकेच्या मृत्यूनंतर स्टेजवर परफॉर्म करताना मुरली यांचा अचानक मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. दुर्दैवाने मुरलीला यांनाही वाचवता आले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT