kantara Varaha Roopam esakal
मनोरंजन

kantara: 'कंतारा'ला दणका! 'वराह रूपम'गाणं वापरण्यास कोर्टाची मनाई...

सकाळ डिजिटल टीम

'कंत्तारा'चित्रपटाची भुरळ हि सर्वांनाच पडली आहे. याचित्रपटाने अनेक विक्रमी रेकॉर्ड केले आहेत. मात्र आता हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. कर्नाटकच्या एका ग्रामीण भागामध्ये भूतकोला नावाची एक प्रथा आहे. कांतारामध्ये ती दाखवण्यात आली आहे. त्यावरुन आता वाद सुरु झाला आहे. त्याआधी कातांरा चित्रपटातील 'वराह रूपम'गाण्याच्या ओळी चोरल्याचा आरोप 'थैक्कुडम ब्रिज' या लोकप्रिय बँडने केला होता आणि कॉपीराइटचे उल्लंघन केल्याचा आरोप करत याचिका दाखल केली होती.

यापार्श्वभूमीवर कोझिकोड जिल्हा सत्र न्यायालयाने 'कंतारा'मधील 'वराह रूपम' हे गाणे वापरण्यास अंतरिम मनाई आदेश ठोठावला आहे.ओटीटी प्लॅटफॉर्म, संगीत चॅनेल, वेबसाइट आणि यूट्यूब याशिवाय निर्माता, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शकासह चित्रपटाच्या निर्मात्यांना थैक्कुडम ब्रिज बँडच्या परवानगीशिवाय गाणे वापरण्यास या आदेशाअंतर्गत बंदी घालण्यात आली आहे.

या बँडचे प्रतिनिधीत्व सतीश मूर्ति यांनी केले, जे भारताच्या सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत आहे. वराह रूपम' हे गाणे थैक्कुडम ब्रिज बँडच्या लोकप्रिय क्रमांक 'नवरसम' सारखेच आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर हा आदेश देण्यात आला आहे.

थैक्कुडम ब्रिजने इस्टांग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात असे लिहिले आहे की, ‘प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश, कोझिकोड यांनी निर्माता, दिग्दर्शक, संगीतकार, Amazon, YouTube, Spotify, Wynk Music, Jiosavan आणि इतरांना थैक्कुडम ब्रिजच्या परवानगीशिवाय कंतारा चित्रपटातील वराह रूपम गाणे वाजवण्यास मनाई केली आहे. थैक्कुडम ब्रिजच्या वतीने म्युझिक अॅटर्नी, सतीश मूर्ती, अधिवक्ता सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यांनी मनाई आदेशाचा दावा दाखल केला आहे."

"सर्वांच्या सतत पाठिंब्याबद्दल धन्यवाद. #navarasam #thaikkudambridge #bethebridge" या कॅप्शनसह पोस्ट शेअर केली आहे.

दरम्यान चित्रपटाचे दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यांनी नुकतेच कोची येथे कॉपीराइटचे उल्लंघन केले नसल्याचा दावा करत या आरोपांचे खंडन केले होते. मात्र, 'नवरसं' या गाणे माहित असून त्यातून प्रेरित झाल्याचे त्यांनी मान्य केले होते. वराह रूपम हे गाणे साई विघ्नेश यांनी गायले असून बी अजनीश लोकनाथ यांनी संगीतबद्ध केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

IND vs WI, 3rd T20I: भारतीय संघात दोन मोठे बदल; वैभव सूर्यवंशीला मिळली संधी? जाणून घ्या Playing XI

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Paithan Highway Accident: पैठण–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अपघात; सूरज एरंडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू, रुग्णवाहिकेसाठी अर्धा तास प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT