मनोरंजन

..तेव्हा मला वाटलं आई पॉर्न साइट चालवते- सारा अली खान

अभिनेत्री सारा अली खान ही तिच्या बिनधास्त अंदाजामुळे नेहमी चर्चेत असते.

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही तिच्या बिनधास्त अंदाजामुळे नेहमी चर्चेत असते. तिचे आई-वडील म्हणजेच सैफ अली खान आणि अमृता सिंग यांच्या घटस्फोटाविषयी ती मोकळेपणे बोलताना दिसते. लहाणपणीचे काही किस्से ती मुलाखतींमध्ये नेहमी सांगिताना दिसते. नुकतंच एका मुलाखतीत साराने सांगितले की, ओमकारा या चित्रपटातील सैफ आणि कलयुग या चित्रपटातील अम्रिताला पाहिल्यानंतर तिला वाटलं की तिचे वडील शिवीगाळ करतात आणि आई पॉर्न साइट चालवते.

'हार्पर बाजार इंडिया' या मासिकेला दिलेल्या मुलाखतीत साराने तिच्या लहानपणीच्या आठवणी सांगितल्या. "मी जेव्हा ओमकारा आणि कलयुग हे चित्रपट पाहिले, तेव्हा मला माझे आई-वडील वाईट आहेत, असं वाटायचं. तेव्हा मी खूप लहान होते आणि मला वाटायचं, माझे वडील शिवीगाळच करतात आणि माझी आई एक पॉर्न साइट चालवते. त्याच वर्षी त्या दोघांना नकारात्मक भूमिकांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्रीचे नामांकन मिळालं होतं", असं ती म्हणाली. २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ओमकारा या क्राईम ड्रामामध्ये सैफ अली खानने 'लंगडा' त्यागीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात अजय देवगण, करीना कपूर, कोंकना सेन शर्मा आणि विवेक ओबेरॉय यांच्याही भूमिका होत्या. तर २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या कलयुग चित्रपटात अमृता सिंगसोबत कुणाल खेमू हा मुख्य भूमिकेत होता.

साराने २०१८ मध्ये अभिषेक कपूरच्या केदारनाथ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने सिम्बा, लव्ह आज कल २, कुली नंबर १ अशा चित्रपटांत काम केलं आहे. ती लवकरच आनंद. एल. रायच्या अतरंगी रे या चित्रपटात अक्षय कुमार आणि धनुषसह मुख्य भुमिकेत दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT