Pearl V Puri  
मनोरंजन

'नागिन' फेम अभिनेता पर्ल पुरीला अटक; बलात्काराचे आरोप

अल्पवयीन मुलीच्या बलात्कारप्रकरणी पर्लसह इतर पाच जणांना अटक

स्वाती वेमूल

प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता पर्ल व्ही. पुरी Pearl V Puri याला मुंबई पोलिसांनी अटक केली. अल्पवयीन मुलीच्या बलात्कारप्रकरणी पर्लसह इतर पाच जणांना वसईतून अटक करण्यात आली. "ही घटना जुनी आहे पण १७ वर्षीय मुलीने तिच्या आईसह पोलीस स्थानकांत येऊन तक्रार नोंदवली असून याप्रकरणी आम्ही गुन्हा दाखल केला आहे", अशी माहिती मिरा भाईंदर वसई विरार झोन २चे उपायुक्त संजय पाटील यांनी दिली. वसई कोर्टाने पर्लला पोलीस कोठडी सुनावल्याचंही त्यांनी सांगितलं. (Naagin actor Pearl V Puri arrested on rape charges)

याप्रकरणी 'नागिन ३' या मालिकेतील पर्लची सहकलाकार अनिता हसनंदानीने त्याची बाजू घेतली आहे. 'पर्लसंदर्भातील ही बातमी तथ्यहीन आहे, मी त्याला ओळखते. हे खरं नाही आणि हे खरं असू शकत नाही. सर्व खोटं आहे. सत्य लवकरच समोर येईल', अशी पोस्ट तिने लिहिली आहे.

पर्लने बऱ्याच मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 'नागिन ३', 'नागार्जुन एक योद्धा', 'बेपनाह प्यार' या मालिकांमध्ये त्याने काम केलंय. 'ब्रह्मराक्षस २' या मालिकेतही तो झळकला होता. २०१३ मध्ये त्याने 'दिल की नजर से खुबसूरत' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT