naagin actress Nia Sharma dancing on the streets at night goes viral 
मनोरंजन

Video; मध्यरात्री भर रस्त्यावर 'डान्स', निया 'फुल्ल टू रॉक्स' 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - अभिनेत्री निया शर्मा तिच्या हटकेपणासाठी प्रसिध्द आहे. त्यामुळे तिची सगळीकडे चर्चा असते. गेल्या काही दिवसांपूर्वी दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात गेलेल्या नियानं आपल्या एका सहका-याच्या विरोधात एक बोल्ड स्टेटमेंट केले होते. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली होती. आताही नियानं असचं काहीसं केलं आहे की ज्यामुळे ती सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. सध्या तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात तिनं फुल्ल टू धमाल केली आहे. भररात्रीच्या वेळी तिनं रस्त्यावर उतरुन तिनं डान्स करायला सुरुवात केली होती. त्यात ती तिच्या आणखी एका सहका-यासह नाचताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये निया आणि तिची मैत्रीण ब्लॅक कलरच्या आऊटफिटमध्ये नाचताना दिसत आहे. त्या दोघींच्या ग्लॅमरस लुकला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात लाईक्स केले आहे. त्याच्यावर कमेंट केली आहे. नियाचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. त्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळते की त्या दोघीजणी एका इंग्लिश गाण्यावर डान्स करत आहे. तसेच त्या व्हिडिओमध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्ट्रीट लॅम्प सुरु आहे. गाडी पार्क करुन त्याच्यासमोर त्या दोघींनी डान्स करायला सुरुवात केली आहे.

त्या व्हिडिओमध्ये निया सुंदर दिसत आहे. व्हि़डिओच्या सुरुवातीला निया कॅटवॉक करताना दिसून येते. त्यानंतर तिनं आपल्या घायाळ अदांनी सर्वांना भुरळ घातली आहे. नियाचे वेगवेगळे व्हिडिओ आणि तिच्या फोटोशुटला मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. आपल्या चाहत्यांचे पुरेपुर मनोरंजन करण्यात ती नेहमी अग्रेसर असते.

यापूर्वीही तिनं एका स्विमिंग पुलच्या किनारी अर्ध्या रात्री फोटोशुट केले होते. त्याच्या व्हिडिओलाही मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंटस मिळाल्या होत्या. तो व्हिडिओ अजूनही तिच्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. 
 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

Latest Marathi News Live Update : MPSC सचिवांना काळं फासलं, संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

SCROLL FOR NEXT