nach ga ghuma marathi movie shooting start mukta barve sukanya mone swapnil joshi  SAKAL
मनोरंजन

Nach Ga Ghuma: संक्रांतीच्या मुहूर्तावर 'नाच गं घुमा'चा चित्रीकरण आरंभ! या लोकप्रिय अभिनेत्री झळकणार

'वाळवी'नंतर परेश मोकाशींच्या 'नाच गं घुमा'च्या शुटींगला सुरुवात झाली आहे

Devendra Jadhav

Nach Ga Ghuma News: परेश मोकाशींनी २०२३ च्या सुरुवातीला 'वाळवी' सिनेमातून सर्वांना दखल घ्यायला भाग पाडलं. या सिनेमाचं सगळीकडे कौतुक झालं. आता परेश मोकाशींनी २०२४ च्या सुरुवातीलाच नवीन सिनेमाची घोषणा केलीय.

तो सिनेमा म्हणजे 'नाच गं घुमा' . 'नाच गं घुमा' सिनेमाच्या शुटींगला आजपासून सुरुवात झाली असून दिग्गज अभिनेत्रींची फौज या सिनेमात दिसणार आहे.

'नाच गं घुमा' सिनेमाच्या शुटींगला सुरुवात

'नाच गं घुमा' सिनेमाच्या टीमने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केलाय. या सिनेमात मुक्ता बर्वे, शर्मिष्ठा राऊत, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, नम्रता संभेराव, आशा गोपाल, मधुगंधा कुलकर्णी या दिग्गज अभिनेत्री झळकणार आहेत.

याशिवाय स्वप्नील जोशी या सिनेमाची निर्मिती करणार आहे. या सिनेमाच्या शुटींगला सुरुवात झाली आहे.

या दिवशी सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला येणार

'नाच गं घुमा' सिनेमा १ मे २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वाळवी नंतर पुन्हा एकदा मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांनी हा सिनेमा लिहीला आहे.

परेश मोकाशी या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे.

निर्माता स्वप्नील जोशी

'नाच गं घुमा' या सिनेमाची निर्मिती करणारा अभिनेता स्वप्नील जोशी म्हणाला, "काम करत असताना कलाकार म्हणून माझ्या निर्मात्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं, माझ्या स्वप्नांना बळ दिलं ! कदाचित म्हणूनच हे धाडस ! मित्रांच्या मदतीने, सह-निर्माता म्हणून एक नवीन प्रवास सुरु करतो आहे ! आईचा आशीर्वाद आहेच ! तुमचा ही असुद्या !"

घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर, जगातील सर्व सर्व स्त्रियांना त्रिवार वंदन करून ‘नाच गं घुमा’ सिनेमाची घोषणा झाली होती. हा सिनेमा लोकांना किती आवडणार, याचं उत्तर १ मे लाच कळेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT