nach ga ghuma marathi upcoming movie directed by paresh mokashi produced by swapnil joshi SAKAL
मनोरंजन

Nach Ga Ghuma Movie: वाळवी, आत्मपॅफ्लेट नंतर परेश मोकाशींचा नवा सिनेमा; 'नाच गं घुमा' ची घोषणा

आत्मपॅफ्लेट नंतर परेश मोकाशींनी नवीन सिनेमाची घोषणा केलीय

Devendra Jadhav

सध्या आत्मपॅफ्लेट सिनेमा चांगलाच गाजतोय. परेश मोकाशी यांनी आत्मपॅफ्लेट सिनेमात त्यांच्या खास आवाजात कथा सांगितली आहे. परेश मोकाशी यांनी आत्मपॅफ्लेट साठी केलेल्या नॅरेशनचं चांगलंच कौतुक होतंय.

आत्मपॅफ्लेट गाजत असतानाच परेश मोकाशी यांनी त्यांच्या पुढच्या सिनेमाची घोषणा केलीय. हा सिनेमा म्हणजे नाच गं घुमा. आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर नाच गं घुमा सिनेमाची घोषणा झालीय.

(nach ga ghuma marathi upcoming movie directed by paresh mokashi)

नाच गं घुमा सिनेमाची घोषणा

हरिश्चंद्राची फॅक्टरी, चि. व चि.सौ.का, वाळवी, एलिझाबेथ एकादशी, आत्मपॅफ्लेट अशा सिनेमानंतर नाच गं घुमा सिनेमाची घोषणा झालीय.

विशेष गोष्ट म्हणजे, या सिनेमाची निर्मिती अभिनेता स्वप्नील जोशी, अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत यांनी केली आहे. नाच गं घुमा सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार यात शंका नाही.

या दिवशी सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला येणार

नाच गं घुमाची आज घोषणा झालीय. हा सिनेमा १ मे २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वाळवी नंतर पुन्हा एकदा मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांनी हा सिनेमा लिहीला आहे.

या सिनेमाची निर्मिती करणारा अभिनेता स्वप्नील जोशी म्हणाला, "काम करत असताना कलाकार म्हणून माझ्या निर्मात्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं, माझ्या स्वप्नांना बळ दिलं ! कदाचित म्हणूनच हे धाडस ! मित्रांच्या मदतीने, सह-निर्माता म्हणून एक नवीन प्रवास सुरु करतो आहे ! आईचा आशीर्वाद आहेच ! तुमचा ही असुद्या !"

घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर, जगातील सर्व सर्व स्त्रियांना त्रिवार वंदन करून ‘नाच गं घुमा’ सिनेमाची घोषणा झालीय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Water Crisis: सांगली-कोल्हापूरला दिलासा, साताऱ्याला उपसाबंदीचा फास; शेतकऱ्यांमध्ये संताप

खासदार वडील शिंदेंच्या शिवसेनेत जाणार, नगरसेवक लेक उद्धव ठाकरेंच्या भेटीला; म्हणाली, निष्ठेने काम...

'Gen-Z'ला शास्त्रीय अन् विंटेज संगीताची भुरळ; डिजिटल युगातही 'रील्स'मुळे जुन्या गाण्यांची जादू आहे कायम !

Zero Watt Bulb Myth : झिरो वॅट बल्बने खरंच लाईट बिल कमी येतं का? पैसे वाचवायचे असतील तर हे नक्की वाचा

Latest Marathi News Live Update : पुण्यात पावसाला सुरुवात

SCROLL FOR NEXT