Munawar Faruqui instagram
मनोरंजन

'नफरत जीत है, कलाकार हार गया'; कॉमेडियन मुनव्वर फारुकीचं ट्विट चर्चेत

ट्विटरवर मुनव्वर फारुकीच्या त्या पोस्टची चांगलीच चर्चा होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी नेहमीच चर्चेत असतो. अनेक कट्टरतावादी संघटनांच्या विरोधानंतर रविवारी बंगळूरु येथे होणाऱ्या मुनव्वर फारुकीच्या स्टँडअप शोला पोलिसांनी परवानगी दिली नाही. मुन्नवर फारुकी याचा हा शो बंगळुरुतील गुड शेफर्ड या ठिकाणी रविवारी संध्याकाळी ५ वाजता होणार होता. पण फारुकी हा वादग्रस्त व्यक्ती असल्याचं सांगत शो रद्द करण्याचे निर्देश पोलिसांनी सभागृह मालकाला दिले. त्यामुळे तो शो रद्द करण्यात आला.

एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुनव्वरच्या कोणत्याही शोसाठी परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या तरी तो कोणताही सार्वजनिक कार्यक्रम करणार नाही, असं स्पष्ट झालं आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या या शोला अनेक संघटनांनी विरोध केला होता. त्याचप्रमाणे त्याच्या विरोधात बंगळुरू पोलीस आयुक्तांकडे तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. यावेळी मुनव्वरवर हिंदू देवतांचा अपमान करून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता.

या संपूर्ण प्रकरणानंतर मुनव्वरने ट्विट केलं आहे. “द्वेष जिंकला आणि कलाकार हरला, गुडबाय आणि अन्याय” असं त्याने पोस्टमध्ये लिहिलं. “आज बंगळुरुमधील एक शोच्या ठिकाणी तोडफोडीच्या धमक्या मिळाल्यानंतर तो रद्द करण्यात आला आहे. मी कधीही न केलेल्या विनोदासाठी मला तुरुंगात टाकले. ज्याचा शोसोबत काहीही संबंध नाही, तो शो रद्द केला जात आहे. हे अन्यायकारक आहे. हा शो कोणत्याही धर्माचा विचार न करता संपूर्ण भारतातील लोकांना आवडला होता. त्यामुळे हे चुकीचे आहे.” असं त्याने सांगितले.

यापुढे फारुकीने सांगितले की, गेल्या दोन महिन्यात आमचे १२ शो रद्द करण्यात आले आहे. या प्रत्येक शो वेळी कार्यक्रमस्थळाची तोडफोड करणे, प्रेक्षकांना त्रास देण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. मी त्यांच्या द्वेषाचा एक भाग बनलो आहे. तर काही लोकांना हसवून मी त्यांच्या जगण्याचा आधार बनलो आहे. जेव्हा तो आधार तुटेल तेव्हाच त्यांच्या इच्छा पूर्ण होतील. पण खरचं असं वाटतंय मी एक तारा बनलो आहे. मात्र , आता वाटतंय की सगळं संपलंय…. गुडबाय.., असं त्यानं त्यात म्हटलं आहे. त्यामुळे सध्या त्याच्या या पोस्टची चांगलीच चर्चा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT