Samantha and naga chaitanya  Instagram
मनोरंजन

Naga Chaitanya Dating: समंथासोबतच्या घटस्फोटानंतर नागा दुसऱ्या लग्नाच्या तयारीत? कुणाला करतोय डेट?

टॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता नागा चैतन्य आणि समंथाच्या घटस्फोटानं चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.

सकाळ डिजिटल टीम

Naga Chaitanya Dating : टॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता नागा चैतन्य आणि समंथाच्या घटस्फोटानं चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. आता एका फोटोनं साऊथच्या या अभिनेत्याविषयी चाहते वेगळी चर्चा करु लागले आहेत. घटस्फोटानंतर तो दुसऱ्या अभिनेत्रीला डेट करत असल्याचे दिसून आले आहे. (Latest Marathi News)

साऊथचा अभिनेता नागा आणि अभिनेत्री शोभिता धुलिपाला यांचे एका रेस्टॉरंटमधील फोटो व्हायरल झाले आहेत. त्यानंतर चाहत्यांनी त्या फोटोंवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

नागा त्या फोटोमध्ये एका शेफसोबत दिसतो आहे. तर त्या फोटोमध्ये बॅकग्राऊंडला त्याची गर्लफ्रेंड शोभिता दिसते आहे. त्या फोटोमध्ये शोभितानं तिच्या चेहऱ्यावर हात ठेवल्याचे दिसून येत आहे.

Also Read - जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

नागा आणि शोभिताचे ते फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यावर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझर्सनं लिहिलं आहे की, आम्हाला वाटतं नागा आता डेटवर आहे. त्या दोघांची जोडी खूपच सुंदर दिसते आहे.

त्यांच्या यापुढील प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. दुसऱ्या युझर्सनं लिहिलं आहे की, तुम्ही दोघेही खूप छान आहात. आता आम्हाला लग्नाची तारीख पण सांगा. दुसऱ्या युझर्सनं म्हटलं आहे की, नागा आणि शोभिता हे डिनर पार्टीला गेले होते.

नागा शोभिताला करतोय डेट?

२०१७ मध्ये साऊथचा प्रसिद्ध अभिनेता समंथा रुथ प्रभु आणि नागा चैतन्य यांचे लग्न झाले होते. मात्र काही काळानंतर त्यांच्या वैवाहिक नात्याला घरघर लागली. सोशल मीडियावर देखील त्यावरुन दोघांच्या नात्याची चर्चा होऊ लागली.

अशातच समंथा आणि नागा चैतन्यानं एकमेकांपासून दूर होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयानं चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.

ऑक्टोबर २०२१ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता. तेव्हापासून ते दोघेही चर्चेत होते. आता नागा शोभिता धुलिपालाला डेट करत असल्याचे दिसून आले. त्यांचे फोटोही व्हायरल झाले होते. त्यावरुन नेटकऱ्यांमध्ये मोठी चर्चा होती.

अशातच ते पुन्हा एकदा डेटिंगच्या निमित्तानं समोर आले आहेत. त्यानंतर त्यांच्या लग्नाची चर्चाही रंगली आहे. त्या फोटोंवरुन त्यांच्यातील नातं आणखी दृढ असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT