nagraj manjule baaplyok marathi movie team visit tuljapur tuljabhavani temple  SAKAL
मनोरंजन

Baaplyok Movie: नागराज मंजुळेच्या ‘बापल्योक’ चित्रपटाची टीम तुळजाभवानीच्या दर्शनाला, केली प्रार्थना

नागराज मंजुळेच्या बापल्योक सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे

Devendra Jadhav

वडिल मुलाच्या नात्याची हळुवार गोष्ट घेऊन २५ ऑगस्टला आपल्या भेटीला येणारा नागराज मंजुळे यांची प्रस्तुती असलेला ‘बापल्योक’ हा मराठी चित्रपट सध्या त्याच्या ट्रेलर आणि गीतांमुळे चांगलाच गाजतोय.

नुकतीच या चित्रपटाच्या टीमने तुळजापूरच्या तुळजाभवानी आईचे दर्शन घेऊन चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना केली.

(nagraj manjule baaplyok marathi movie team visit tuljapur)

बापल्योकचे कलाकार तुळजापूर परिसरातले

विशेष म्हणजे 'बापल्योक’ या चित्रपटाचे शूटिंग तुळजापूर परिसरातील असून चित्रपटातील बहुतांशी कलाकार तुळजापूर, सोलापूर परिसरातील आहेत. मकरंद माने या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

चित्रपटात वडिलांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते शशांक शेंडे असून त्यांच्या मुलाची भूमिका विठ्ठल काळे यांनी साकारली आहे.

या दोघांसोबत अभिनेत्री पायल जाधव, नीता शेंडे चित्रपटात दिसणार आहेत. ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’चे विजय शिंदे आणि बहुरूपी प्रोडक्शन्स’च्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

नागराज मंजुळे निर्मित बापल्योक

नागराज आणि मकरंद यांच्या 'बापल्योक' या आगामी मराठी चित्रपटाद्वारे पायल जाधव ही नवोदित अभिनेत्री सिनेसृष्टीत दाखल होणार आहे.

राष्ट्रीय पारितोषिकाला गवसणी घालणाऱ्या दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि दिग्दर्शक मकरंद माने यांचा 'बापल्योक' हा आगामी चित्रपट २५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटाचे नागराज मंजुळे प्रस्तुतकर्ते आहेत.‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’चे विजय शिंदे, आणि बहुरूपी प्रोडक्शन्स’च्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून दिग्दर्शन मकरंद माने यांचे आहे.

बापल्योक च्या ट्रेलरला मिळाला चांगला प्रतिसाद

मनापासून केलेली चांगली कलाकृती प्रेक्षकांपर्यत पोहचते. ‘बापल्योक’ चित्रपटाच्या ट्रेलर आणि गीताला मिळलेला प्रतिसाद हेच दाखवून देतो. हा चित्रपट अनेक नानाविध नात्यांची गुंफण असून बापलेकाच्या नात्यातील मायेचा पदर उलगडून दाखविणारा 'बापल्योक’ प्रत्येकाला खूप काही देणारा असेल, असा विश्वास निर्माते विजय शिंदे व्यक्त करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ग्रामपंचायतींचा नोव्हेंबरअखेर वाजणार बिगुल? सरपंच आरक्षण जाहीर, आता सदस्यांची आरक्षण सोडत १२ जूनला; मतदार यादी ‘या’ महिन्यात होणार अंतिम

येत्या जून महिन्यात बनतोय अत्यंत खतरनाक खप्पर योग ! रातोरात बदलणार नशीब; कुणाला शुभ तर कुणाला अशुभ घ्या जाणून

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

SCROLL FOR NEXT