nagraj manjule new marathi movie frame with amey wagh  SAKAL
मनोरंजन

Nagraj Manjule: पत्रकारांच्या जगण्यावर भाष्य? नागराज मंजुळेंचा आगामी सिनेमा 'फ्रेम', या अभिनेत्याची प्रमुख भुमिका

नाळ भाग 2 नंतर नागराज मंजुळेंच्या नवीन सिनेमाची घोषणा झालीय

Devendra Jadhav

Nagraj Manjule New Movie: नागराज मंजुळे हे भारतीय मनोरंजन विश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक - अभिनेते. नागराज मंजुळेंचा प्रत्येक सिनेमा पाहणं एक पर्वणी असते. फँड्री, सैराट अशा सिनेमांमधून नागराजने उत्कृष्ट काम केलंय.

नागराजचे सिनेमे पाहणं एक पर्वणी असते. नागराज प्रत्येक सिनेमांमधून मनोरंजन करण्यासोबतच सामाजिक विषय मांडताना दिसतो. अशातच नागराजच्या आगामी सिनेमाची घोषणा झालीय. या सिनेमाचं नाव फ्रेम.

नागराजचा आगामी सिनेमा फ्रेम

नागराज मंजुळेचा आगामी सिनेमाची घोषणा झालीय. या सिनेमाचं नाव आहे फ्रेम. फ्रेमचा टीझर नाळ 2 सोबत दाखवण्यात येतोय. फ्रेमच्या टीझरमध्ये सुरुवातीला पाहायला मिळतं की एका बुलेटवर Press असं लिहीलं असतं. या बुलेटमधून नागराज मंजुळे उतरतात. त्यांच्यासमोर लोकांची गर्दी वेगाने पळत असते. नागराज त्या गर्दीचे त्यांच्या कॅमेरात फोटो काढतात.

नागराजच्या सिनेमात हा अभिनेता झळकणार हा अभिनेता

नागराज मंजुळेंच्या आगामी फ्रेम सिनेमाचं दिग्दर्शन केलंय विक्रम पटवर्धन यांनी. या सिनेमात स्वतः नागराज मंजुळे प्रमुख भुमिकेत आहेत. ते या सिनेमात फोटोजर्नलिस्टची भुमिका साकारताना दिसणार आहेत.

याशिवाय या सिनेमात नागराज मंजुळेंसोबत सध्या आघाडीचा अभिनेता झळकणार आहे तो म्हणजे अभिनेता अमेय वाघ. अमेय वाघची झलकही टीझरमध्ये पाहायला मिळते.

हा सिनेमा पुढच्या वर्षी २०२४ ला भेटीला येणार आहे. सिनेमाच्या टीझरवरुन हा सिनेमा पत्रकारांच्या आयुष्यावर भाष्य करणार अशी शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khambatki Ghat Traffic : ऐन दिवाळीत खंबाटकी घाटात मोठी वाहतूक कोंडी; वाहनचालक हैराण, सातारा-पुणे महामार्गावर लांबलचक रांगा

VIDEO : गरीब रथ एक्सप्रेसला भीषण आग, अनेक प्रवासी जखमी; सकाळी ७ वाजता घडली दुर्घटना

संदर्भ पत्र का दिले नाही? जातीयवादाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर प्राचार्यांनी केला खुलासा

Diwali Muhurat Trading 2025: मुहूर्त ट्रेडिंग संध्याकाळी नाही तर 'या' वेळी होणार; का बदलली वेळ?

Latest Marathi News Live Update : गरीब रथ एक्सप्रेसला भीषण आग

SCROLL FOR NEXT