Namrata Sambherao shared post for vishakha subhedar about America tour marathi drama kurrr  sakal
मनोरंजन

Namrata Sambherao: फक्त स्वप्नं रंगवलं होतं आणि आज.. अमेरिकेतून नम्रता संभेरावची खास पोस्ट..

नम्रताच्या या भावनिक पोस्टनं सगळ्यांचच लक्ष वेधलं आहे.

नीलेश अडसूळ

Maharashtrachi Hasyajatra fame namrata sambherao: गेल्या काही वर्षात सोनी मराठी वाहिनीवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मालिकेने अक्षरशः महाराष्ट्राला वेड लावले आहे. या कार्यक्रमातील एक अविभाज्य घटक म्हणजे 'नम्रता संभेराव'.

तिनं साकारलेली 'लॉली' असो, 'आई' असो किंवा नुकतेच सर्वांसमोर आलेले 'पावली' हे पात्र असो. तिच्या प्रत्येक भूमिकेनं आपल्याला हसवलं आहे. ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. सतत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.

मध्यंतरी तिने आपल्या अमेरिका दौऱ्या विषयी एक भावनिक पोस्ट शेयर केली होती. ज्यामध्ये तिने तिच्या बाळाला सोडून जाताना कसं वाटतंय त्याबद्दल लिहिलं होतं. पण आज तिने थेट अमेरिकेतून पोस्ट शेयर केली आहे. तिच्या या पोस्टने सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे.

(Namrata Sambherao shared post for vishakha subhedar about America tour marathi drama kurrr )

गेल्या वर्षी 'कुर्ररर' हे नाटक आपल्या भेटीला आलं. सध्या या नाटकाची बरीच चर्चा आहे. या नाटकाचे लेखन दिग्दर्शन प्रसाद खांडेकरनेच केलं असून विशाखा सुभेदार या नाटकाची निर्माती आहे. सध्या या नाटकाचे महाराष्ट्रभर दौरे सुरू आहेत.

विशेष म्हणजे सध्या या नाटकाचा विदेश दौरा सुरू असून या नाटकाची संपूर्ण टीम अमेरिकेमध्ये गेली आहे. यावेळी नम्रतासोबत विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर आणि पंढरीनाथ कांबळे देखील आहे. जवळपास एका महिन्याचा हा दौरा आहे. यामध्ये नाटकसोबतच ते मनसोक्त फिरणार देखील आहे.

अशीच भटकंती करतानाच एक फोटो नम्रताने शेयर केला आहे. आणि सोबत एक भन्नाट कॅप्शन दिले आहे.

या पोस्टमध्ये नम्रता म्हणाली आहे की, '' The excitement of dreams coming true is beyond the description of words (स्वप्न साकार होण्याचा उत्साह शब्दांत वर्णन करण्यापलीकडचा आहे..) फक्त स्वप्नं रंगवलं होतं अमेरिकेत जाण्याचं, पण इथे येऊन मनोरंजन करायला मिळतंय आणि मुबलक फिरायला देखील मिळतंय.. विशाखा ताई thank you so much (तुझे खूप खूप आभार..) माझं अनेक स्वप्नांपैकी हे एक स्वप्न पूर्ण करण्याबद्दल''

अशी पोस्ट नम्रताने केली आहे. ही पोस्ट विशाखा सुभेदारसाठी तिने लिहिली आहे. विशाखा या नाटकाची निर्माती असल्याने तिच्यामुळे हा दौरा शक्य झाला. म्हणून नम्रताने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही पोस्ट लिहिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT