Namrata Sambherao Son rudraaj special rule for mother! maharashtrachi hasyajatra actress SAKAL
मनोरंजन

Namrata Sambherao: मुलाचा आईसाठी खास नियम! लेकाच्या वाढदिवसाला नम्रताने केला खुलासा

नम्रता संभेरावने लेकाच्या वाढदिवसाला त्याची एक खास गोष्ट सांगितलीय

Devendra Jadhav

Namrata Sambherao News: महाराष्ट्राची हास्यजत्रा हा सोशल मीडियावरील खास शो. महाराष्ट्राची हास्यजत्राच्या माध्यमातुन सर्वच कलाकार प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत.

हास्यजत्रातील महत्वाची अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव. नम्रता सोशल मीडियावर चर्चेत असते. नम्रताचा मुलगा रुद्राजचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने नम्रताने लेकासाठी खास पोस्ट लिहीलंय.

(Namrata Sambherao Son rudraaj special rule for mother! maharashtrachi hasyajatra actress)

नम्रताच्या लेकाने आईसाठी बनवला खास नियम

नम्रताने सोशल मीडियावर लेकासोबतचा खास फोटो पोस्ट केलाय. हा फोटो पोस्ट करुन नम्रता लिहीते, "तुझ्या चेहऱ्यावरचं हे गोड हसू पाहिलं की माझं आयुष्य वाढतं कारण मी घरी आल्यावर पळत येऊन दार उघडायचं आणि घरात पाऊल ठेवायच्या आधी घट्ट मिठी मारायची हा आता त्याने त्याचा बनवलेला नियम आहे.

त्यामुळे घरी जाण्याची ओढ लागते कधी एकदा तो हसरा चेहरा ती गोड मिठी अनुभवतेय असं होतं. आई तू माझी favorite आहेस तू माझी आई आहेस असं तुझ्या नाजूक आवाजात ऐकलं की आई झाल्याचा अभिमान गर्व वाटतो. I love you so much."

अनेकांनी नम्रताच्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.

नम्रताच्या मुलाचा मराठी बोलण्याचा आग्रह

नम्रता अनेकदा सोशल मीडियावर तिच्या मुलाचे व्हिडीओ शेअर करत असते. काही दिवसांपुर्वीनम्रताने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर केला होता. यात तिचा मुलगा रुद्राज आईला मराठीत बोलायला सांगतोय.

"आपली अमेरिका नाहीये आई, आपली इंडिया आहे. इंडियामध्ये सगळे मराठीच बोलतात. आणि तू इंडियामध्ये बोलतेय इंग्लिश. इंडियामध्ये मराठीच बोलायचं इंग्लिश नाही बोलायचं." असं रुद्राज आईला सांगतो.

यावर नम्रता त्याला म्हणते, "मराठीच बोलू. इंग्लिश नको बोलू.

"हो आई!", असं रुद्राज आईला सांगतो. हा व्हिडीओ पाहून सर्वजण नम्रताच्या मुलाचं कौतुक करत आहेत.

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम नम्रता संभेराव सोशल मिडीयावर चांगलीच चर्चेत असते. नम्रताचं प्रचंड फॅन फोलोईंग आहे. नम्रता हास्यजत्रेत साकारत असलेल्या लॉली, ओंक्याची आई, सुनबाई अशा सर्व व्यक्तिरेखा प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत

नम्रता आणि तिचा मुलगा रुद्राजची जोडी सर्वांना आवडते. तिच्या नवऱ्याचं नाव योगेश संभेराव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT