Nana Patekar: Nana Patekar apologizes for hitting fan, says.. I misunderstood journey fim SAKAL
मनोरंजन

Nana Patekar: फॅनला मारल्याबद्दल नाना पाटेकर यांनी मागितली माफी, म्हणाले.. माझा गैरसमज झाला

नाना पाटेकर यांनी सेल्फी घ्यायला आलेल्या फॅनला मारल्याचा व्हिडीओ काल तुफान व्हायरल झाला

Devendra Jadhav

Nana Patekar Apology on Viral Video: नाना पाटेकर हे मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते. नानांनी आजवर अनेक सिनेमांंमधून स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली. नाना पाटेकर यांचा एक व्हिडीओ काल सोशल मीडियावर व्हायरल झाला.

या व्हिडीओत सेल्फी घ्यायला आलेल्या एका फॅनला नाना पाटेकर यांनी मारल्याचं दिसलं. नाना पाटेकर यांनी या प्रकरणाबद्दल जाहीर माफी मागत, नेमकं काय घडलं याचा खुलासा केलाय.

नाना पाटेकरांचा माफीनामा, सांगितलं खरं कारण

नाना पाटेकर म्हणतात, 'एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मी एका मुलाला मारल्याचं दिसतंय. हा सीन करणं आमच्या चित्रपटाचा भाग आहे, आमची रिहर्सल सुरु होती. त्यावेळी दिग्दर्शकाने या सीनची फायनल रिहर्सल करायाला सांगितली. व्हिडिओमध्ये दिसणारा मुलगा आला तेव्हा आम्ही रिहर्सलला सुरुवात करणार होतो.

नाना पाटेकर पुढे म्हणाले, 'मला माहित नव्हते की तो कोण होता? मला वाटले की तो आमच्या क्रूपैकी एक आहे, म्हणून मी त्याला रिहर्सलनुसार त्याला मारलं आणि त्याला निघून जाण्यास सांगितले. नंतर मला कळले की तो क्रूचा भाग नव्हता, म्हणून मी त्याला परत बोलावले, पण तो पळून गेला. हा व्हिडिओ त्याच्या मित्राने शूट केला असण्याची शक्यता आहे.

नाना पाटेकर म्हणाले, 'मी कधीही कोणाला फोटो काढण्यास नकार दिला नाही. मी असे कधीच केले नसते...जे काही झाले ते चुकून झाले. काही गैरसमजांमुळे हे घडले. मला क्षमा करा. मी पुन्हा असं कधीच करणार नाही'.

नाना पाटेकर यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्यांना नाराजी सहन करावी लागली. अखेर त्यांनी जाहीर माफी मागितल्याने या वादावर पडदा पडला असं म्हणता येईल

नाना पाटेकर सध्या वाराणसीत 'जर्नी' चित्रपटाचं शुटींग करत आहेत. 'गदर 2' फेम दिग्दर्शक अनिल शर्मा या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. नाना पाटेकर व्यतिरिक्त अभिनेता उत्कर्ष शर्मा देखील 'जर्नी' मध्ये दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : ''परधर्मातील मुलासोबत पळून जाणाऱ्या मुलींचे हातपाय तोडा'', भाजपच्या माजी खासदाराचं वादग्रस्त विधान!

IND vs AUS 1st ODI Live: टीम इंडियाला अक्षर पटेल, लोकेश राहुलने दिला आधार; २६ षटकांच्या सामन्यांत ऑसींसमोर 'इतके' लक्ष्य

Crime: लग्नाच्या ११ दिवसांनी १६ वर्षीय मुलीने बाळाला जन्म दिला, नंतर १९ व्या दिवशी पतीला अटक अन्...; घटना वाचून डोकं चक्रावेल

Nashik News : दत्त मंदिराची त्वरित पुनर्स्थापना करा; हिंदू एकता आंदोलन आणि काँग्रेस पक्षाचा प्रशासनाला इशारा

Latest Marathi News Live Update : बदलापुरात 17 हजार बोगस मतदार

SCROLL FOR NEXT