Nana Patekar Birthday...childhood memory Google
मनोरंजन

Nana Patekar: लहानपणी घडलेल्या 'त्या' घटनेनंतर नाना पाटेकरांनी आजपर्यंत मिठाईला कधी हातही लावला नाही..

आज करोडोच्या संपत्तीचे मालक असणारे नाना साधं आयुष्य जगतात यामागे त्यांच्या बालपणीच्या काही कटू आठवणी हे मुख्य कारण आहे,

प्रणाली मोरे

ीNana Patekar: विश्वनाथ पाटेकर उर्फ नाना पाटेकर यांचे वडील टेक्सटाइल पेंटिगचा छोटासा व्यवसाय करत होते. पण त्यांच्या वडीलांना जवळच्याच नातेवाईकानं धोका दिला आणि त्यांची सगळी संपत्ती देखील लुटली. याचे चटके नानांनाही सहन करावे लागले. वयाच्या १३ व्या वर्षापासून कुटुंबासाठी काम करणं नानांना भाग पडलं. नाना पाटेकर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की ते सिनेमांचे पोस्टर पेंट करण्यासाठी चुनाभट्टीपर्यंत ८ किलोमीटर ते पायी चालत जायचे आणि या कामाचा त्यांना ३५ रुपये इतका रोजगार दिला जायचा.(Nana Patekar Birthday...childhood memory)

नाना पाटेकर यांनी झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे रस्त्यावर पेंट करायचं काम देखील केलं आहे. ते एकदा म्हणाले होते, ''आमच्यावर ओढवलेल्या गरीबीचं वडीलांना कायम दुःख वाटत रहायचं. म्हणायचे,माझ्या मुलांचे खायचे प्यायचे दिवस आले आणि माझ्याजवळ काही नाही. आणि याच दुःखाचं ओझं वडील सहन करू शकले नाहीत आणि त्यात आपल्या वडीलांना हार्ट अटॅक आला''. नाना २८ वर्षाचे असताना त्यांच्या वडीलांचे निधन झाले.

एका मुलाखतीत जेव्हा नाना पाटेकर यांना विचारलं गेलं की ते कायम रागात का असतात?. तेव्हा त्यांनी त्याचे कारण सांगितले होते की,''लहानपणी जो अपमान मी सहन केलाय, ज्या पद्धतीनं लोकांनी वागवलं आहे...हे यामागचं मोठं कारण आहे. आजही लहानपणीचा काळ आठवला की डोळ्यात पाणी येतं. त्या काळात आपण अनेकदा लंच किंवा डिनरच्या वेळी मित्रांच्या घरी त्यांची विचारपूस करायला डोकवायचो ते या कारणाने की कुणीतरी जेवणासाठी थांबवेल आणि आपल्याला जेवायला मिळेल''.

आपल्यासाठी भाकरीच्या सुंगधापेक्षा मोठं काही नाही..असं देखील एका मुलाखतीत नाना म्हणाले होते. ''पैसा नसल्यानं खाण्याचे हाल झाले त्याकाळी आपण हरलो आहोत ही जाणीव सारखी व्हायची,स्वतःला कमी लेखायला लागलो होतो आणि याचाच राग यायचा..आणि तो पुढे जाऊन माझा स्वभाव बनला. मला कधी कोणावर हात उगारायला आवडत नाही पण अनेकदा उगाचच मनात येतं की एखाद्याला चांगलं बेदम मारावं.पण आज जे मला राग देतात त्यांना पाहिलं की माझ्या डोळ्यात नकळत पाणी येतं. ९ वी मध्ये असताना अनेकदा वाट्याला आलेला अपमान आणि उपासमार या गोष्टींमुळे इतकं काही शिकलो की पुढे अभिनय शिकायला जायची गरजच लागली नाही''.

खूप लहानपणी काम करायला लागलं,कष्ट वाट्याला आले याचं दुःख वाटत नाही कारण मला माझ्या आई-वडीलांना सुखी पहायचं होतं,असं एकदा नाना म्हणाले होते. पण लहानपणी इतकं काय भोगलं आहे ज्यानंतर मिठाई या शब्दावरनं देखील मन उडालं असंही नाना म्हणाले. आपल्या एका जुन्या मुलाखतीत नानांनी सांगितलं होतं की,'' लहानपणी मिठाई खूप आवडायची पण तेव्हा ती कधीच मिळाली नाही..फक्त पाहून आनंद घ्यायचो. पण यामुळे नंतर मिठाईवरनं असं मन उडालं की आजपर्यंत कधी मिठाईला हात लावला नाही''. नाना म्हणाले होते,''मिठाई माझ्यासाठी सोनं...जे पाहू शकतो...पण खाऊ शकत नाही''.

बॉलीवूडमध्ये नानांचे पदार्पण १९७८ साली 'गमन' सिनेमातून झालं होतं. पण त्यांच्या कामाला खरी ओळख मिळाली ते पदार्पणाच्या १० वर्षानंतर..मीरा नायर यांच्या 'सलाम बॉम्बे' या १९८८ साली आलेल्या सिनेमामुळे. त्यांनतर १९८९ साली विधु विनोद चोप्रा यांच्या 'परिंदा' सिनेमातून गॅंगस्टर अण्णा या भूमिकेतून त्यांनी सिनेमा पाहणाऱ्या प्रेक्षकाच्या अंगावर काटा आणला होता. यासाठी त्यांन राष्ट्रीय पुरस्कारानं सम्मानित केलं गेलं होतं.

नानांच्या खलनायकी भूमिकांना पाहूनच संजय दत्त आधी 'खलनायक' सिनेमातील मुख्य भूमिका सुभाष घईंनी नाना पाटेकर यांना देण्याचा निर्णय घेतला होता. पण तेव्हा प्लॅन होता एक आर्ट सिनेमा बनवायचा पण जेव्हा मसालेदार हिंदी सिनेमा बनवायचं घई यांनी ठरवलं तेव्हा त्यांचा निर्णय बदलून त्यांनी 'खलनायक' संजय दत्तला ऑफर केला. ही गोष्ट स्वतः सुभाष घई यांनी एका मुलाखतीत सांगितली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT