Nana Patekar esakal
मनोरंजन

Nana Patekar : 'आता मी म्हातारा झालोय'! नाना असे का म्हणाले? कोणत्या गोष्टीचा आला राग

नाना हे त्यांच्या आक्रमक आणि तितक्याच परखड शैलीतील वक्तव्यासाठी ओळखले जाणारे सेलिब्रेटी आहे.

युगंधर ताजणे

Nana Patekar bollywood Actor The Vaccine War : नाना पाटेकर यांच्याविषयी जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. गेल्या साडेतीन दशकांहून अधिक काळ नानांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचे अमाप मनोरंजन केले आहे. बॉलीवूडमध्ये मोठ्या दमदारपणे स्वताची वेगळी ओळख नानांनी तयार केली आहे. अजूनही तरुणांमध्ये नानांची स्टाईल, त्यांचे व्यक्तिमत्व हा चर्चेचा विषय आहे.

नाना हे त्यांच्या आक्रमक आणि तितक्याच परखड शैलीतील वक्तव्यासाठी ओळखले जाणारे सेलिब्रेटी आहे. आता नाना हे त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये नानांनी पुन्हा एकदा त्यांच्या स्पष्टवक्तेपणाचा प्रत्यय करुन दिला नाही. नाना ही कोणतीही गोष्ट कुणाची भीड न ठेवता बोलून मोकळे होतात हे त्यांच्या आजवरच्या प्रतिक्रियांमधून दिसून आले आहे.

Also Read - हॅप्पी हार्मोन...

तुम्हाला आठवत असेल अनीस बज्मी यांच्या वेलकमच्या दोन्ही भागांमध्ये नानांनी महत्वाची भूमिका साकारली होती. त्यात त्यांनी पहिल्यांदाच एका विनोदी भाईची साकारलेली भूमिका प्रेक्षकांना कमालीची आवडली. त्याचे खूप कौतुकही झाले होते. वेलकम २ मध्ये देखील ते तितक्याच प्रभावीपणे कार्यरत होते. त्यावेळीही प्रेक्षकांनी नानांच्या भूमिकेवर कौतुकाचा वर्षाव केला होता. आता ते विवेक अग्निहोत्री यांच्या द व्हॅक्सिन वॉरमध्ये दिसणार आहे.

नाना हे अग्निहोत्री यांच्या द व्हॅक्सिन वॉर मध्ये एका शास्त्रज्ञाच्या भूमिकेत दिसणार आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना नानांना तुम्हाला वेलकम ३ मध्ये का नाही घेतले असा प्रश्न जेव्हा विचारण्यात आले तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर हे चर्चेत आलं आहे. यावेळी भलेही नानांनी त्यांच्या नेहमीच्या रोखठोक शैलीत उत्तर दिलं असेल मात्र त्या उत्तराची सोशल मीडियावर जी चर्चा सुरु झाली आहे त्यातून वेगळे अर्थ समोर येत आहेत.

नाना हे मराठीतील एकमेव असे अभिनेते आहेत ज्यांनी बॉलीवूडपटांमध्ये हिरो म्हणून नेहमीच स्वताची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नानांनंतर आवर्जून नाव घ्यावे असे नाव नाही. त्यामुळे नानांनी त्या उत्तरामध्ये आपण आता म्हातारे झालो अशी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही आता काही जणांना म्हातारे वाटू लागले आहोत त्यामुळे की काय आम्हाला संधी मिळत नाही. अशी मिश्किल टिप्पणी नानांनी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT