nana patekar comment on jawan and gadar 2 the vaccine war trailer launch event  SAKAL
मनोरंजन

Jawan: नाना पाटेकर यांनी जवान, गदर 2 वर साधला निशाणा? म्हणाले, "मी सहन करु शकलो नाही..."

नाना पाटेकरांनी नाव न घेता जवान आणि गदर 2 वर निशाणा साधल्याची चर्चा आहे

Devendra Jadhav

द व्हॅक्सीन वॉर सिनेमाचा ट्रेलर काल प्रेक्षकांच्या भेटीला आला. सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला.

द व्हॅक्सीन वॉर सिनेमाच्या ट्रेलरवेळी नाना पाटेकर यांनी जवान आणि गदर 2 या सुपरहिट सिनेमांवर निशाणा साधला अशी चर्चा आहे. काय म्हणाले नाना पाटेकर बघूया.

(nana patekar comment on jawan and gadar 2)

नाना पाटेकर यांचा गदर 2, जवान वर निशाणा?

द व्हॅक्सीन वॉरच्या ट्रेलरवेळी नाना पाटेकर यांनी अनेक विषयांवर मौन सोडलं. यावेळी जवान किंवा गदर 2 चे नाव न घेता नाना पाटेकर म्हणाले, "आजकाल लोक असे चित्रपट पाहतात किंवा त्यांना तसे सिनेमे पाहायला जबरदस्ती केली जाते. मी असे चित्रपट जास्त काळ सहन करू शकत नाही."

नाना पाटेकर पुढे म्हणाले, "मी काल खूप हिट चित्रपट पाहिला. पण तो चित्रपट पूर्ण पाहू शकलो नाही. पण तो सिनेमा खुप चालला यार. आता जेव्हा असा सिनेमा चालतो तेव्हा आम्हाला असे वाटते की, असे सिनेमे पुन्हा पुन्हा दाखवून आम्हाला ते आवडण्यास भाग पाडत आहेत."

वेलकम 3 मध्ये का नाही? नाना पाटेकर म्हणाले...

मंगळवारी 'द व्हॅक्सिन वॉर'च्या ट्रेलर लाँचवेळी या वेलकम 3 संदर्भात प्रश्न विचारला असता नाना पाटेकर थोडे नाराज झाले. ते म्हणाला, "अशा चित्रपटात काम करणं जितकं अवघड आहे, त्यापेक्षा जास्त अवघड आहे तशा सिनेमात काम करणं."

वेलकम 3 मध्ये कास्ट न करण्याबाबत नाना पुढे म्हणाले, "त्यांना वाटतं की आम्ही जुने कलाकार झालो आहोत, कदाचित म्हणूनच ते आम्हाला घेत नाहीत. आता विवेक सारख्या लोकांना वाटतं की आम्ही जुने नाही झालो म्हणुन आम्हाला विचारतात. प्रत्येकाला काम मिळते, आता तुम्हाला करायचे आहे की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे."

द व्हॅक्सीन वॉर या तारखेला होणार रिलीज

विवेक अग्निहोत्री यांच्या या चित्रपटामध्ये प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर एका शास्त्रज्ञाच्या भूमिकेत आहेत. याशिवाय अभिनेत्री पल्लवी जोशी, गिरीजा ओक, रायमा सेन यांच्याही भूमिका यात आहेत.

हा चित्रपट याच महिन्यात २८ तारखेला प्रदर्शित होणार आहे. त्याच्या व्हायरल झालेल्या ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईला जागतिक दर्जाचे टनेल मत्स्यालय मिळणार! कुठे अन् कधी पूर्ण होणार? बीएमसीने संपूर्ण योजना सांगितली

Elon Musk X Chat Messaging App : इलॉन मस्कने लाँच केलं X Chat! ; आता ‘WhatsApp’ अन् ‘Arattai’ला जबरदस्त टक्कर

School Trip Rules: शिक्षकांसह विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! शैक्षणिक सहलीसाठी नवे नियम लागू

CNG Supply: मुंबईतील सीएनजी पुरवठा कधी सुरळीत होणार? एमजीएलने तारीख अन् वेळच सांगितली, वाहनचालकांना मोठा दिलासा

Numerology Predictions : 'या' तारखेला जन्मलेले लोक असतात जास्त निरोगी..वयाची साठी पार केली तर जडत नाहीत आजार

SCROLL FOR NEXT