Nana Patekar and Amol Kolhe 
मनोरंजन

'गोडसेची भूमिका साकारणं म्हणजे..'; अमोल कोल्हेंच्या भूमिकेबाबत नाना पाटेकरांची प्रतिक्रिया

'व्हाय आय किल्ड गांधी' या चित्रपटात अमोल कोल्हेंनी साकारली गोडसेची भूमिका

स्वाती वेमूल

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी चित्रपटात नथुराम गोडसेची (Nathuram Godse) भूमिका साकारल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. 'व्हाय आय किल्ड गांधी' (Why I killed Gandhi) या चित्रपटात त्यांनी ही भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित झाला असून आता तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. येत्या 30 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यावरून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) हे अमोल कोल्हेंच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. 'गोडसेची भूमिका साकारणं म्हणजे त्याच्या प्रवृत्तीचं समर्थन करणं नाही', असं त्यांना एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय.

काय म्हणाले नाना पाटेकर?

"मी स्वत: पडद्यावर नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. अमोल कोल्हेंनी त्याची भूमिका स्वीकारली, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांनी समर्थन केलं असं होत नाही. गोडसेची भूमिका साकारणं म्हणजे त्याच्या प्रवृत्तीचं समर्थन केलं असं नाही. कोल्हे हे एक अभिनेते आहेत आणि कलाकार म्हणून त्यांनी ती भूमिका साकारली. अशा छोट्या गोष्टींना फारसं महत्त्व देऊ नका. इतर जे महत्त्वाचे विषय आहेत त्यावर चर्चा करा", अशी प्रतिक्रिया नाना पाटेकरांनी दिली.

भूमिकेबाबत अमोल कोल्हेंचं स्पष्टीकरण-

"२०१७ मध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण झालं होतं. मी राजकारणात सक्रीय नसताना ही भूमिका साकारली होती. एखादी भूमिका करतो म्हणजे त्या विचारधारेसोबत सहमत असतो असं कधीच नसतं. काही विचारांसोबत आपण सहमत असतो. तर काही विचारधारांसोबत असहमत असतानाही आपण ती भूमिका करतो. माझ्या वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यातसुद्धा नथुराम गोडसेचे उदात्तीकरणाच्या संदर्भात मी कधीही भूमिका घेतलेली नाही", असं कोल्हेंनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

Crime News : कसबे सुकेणे हादरले! शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न, गावकऱ्यांनी आरोपींना दिला चोप

Thane News: मराठीसाठी लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास स्वराज्य विनामूल्य केस लढणार, ॲड. जय गायकवाड यांची भूमिका

Shravan Pradosh Vrat 2025: यंदाच्या श्रावणात किती प्रदोष व्रत आहेत? जाणून घ्या तारीखा आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT