'Narcos' and 'The Cleaning Lady' fame actor Adan Canto dead at 42 Esakal
मनोरंजन

Adan Canto Dies: 'द क्लीनिंग लेडी' फेम अभिनेत्याची कॅन्सरशी झुंज अपयशी! 42 वर्षी घेतला अखेरचा श्वास

एडनच्या निधनाच्या बातमीनंतर हॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

Vaishali Patil

'Narcos' and 'The Cleaning Lady' fame actor Adan Canto dead at 42: हॉलिवूड विश्वातून एक अतिशय वाईट बातमी समोर येत आहे. मेक्सिकन-अमेरिकन अभिनेता एडन कॅन्टोचे निधन झाले आहे. त्याने वयाच्या ४२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

एडनच्या निधनाच्या बातमीनंतर हॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. त्याच्या चाहत्यांना आणि मित्रांना त्याच्या निधनाच्या बातमीने धक्का बसला आहे. चाहते त्याला श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

एडनने मेक्सिकोमध्ये राहून गायक म्हणून आपल्या करियरला सुरूवात केली. एडनला टीव्ही मालिका 'द क्लीनिंग लेडी' द्वारे हॉलीवूड चित्रपटसृष्टीत ओळख मिळाली. त्याने या मालिकेत मुख्य अभिनेता अरमान मोरालेसची भूमिका साकारली होती. एडन बऱ्याच काळापासून कॅन्सरशी लढत होता.

त्याने 'द क्लीनिंग लेडी' या मालिकेचे बॅक टू बॅक दोन सीझन केले. त्यांची तब्येत बिघडल्यामुळे तो 'द क्लीनिंग लेडी'च्या तिसऱ्या सीझनमध्ये काम करु शकला नाही. एडन बऱ्याच काळापासून appendiceal कॅन्सरने त्रस्त होता. हा कॅन्सरचा अतिशय दुर्मिळ प्रकार आहे. यात अपेंडिक्समधील पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात आणि योग्य वेळी उपचार न केल्यास त्यांचे कर्करोगात रूपांतर होऊ शकते.

Aidan हा टीव्ही मालिका तसेच हॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसला होता. त्याने 2009 मध्ये त्याच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. 2014 मध्ये, तो 'एक्स-मॅन - डेज ऑफ फ्यूचर पास्ट' या प्रसिद्ध चित्रपट मालिकेत दिसला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: OUT or NOT OUT? जो रूटने अफलातून झेल, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; राहुल द्रविडचा विक्रम मोडला, पण रंगलाय वाद

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Shambhuraj Desai : संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली

खरीप हंगामात ८१,००० शेतकऱ्यांना ११४० कोटींचे पीककर्ज! ६३ हजार ८४९ शेतकऱ्यांच्या १०३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे बॅंकांनी केले नवे-जुने

Latest Marathi News Updates: 'सीएम'पदासाठी भाजपात पक्ष विलिन करण्याची शिंदेंची तयारी - संजय राऊतांचा टोला!

SCROLL FOR NEXT