Nargis Fakhri recalls living in a ‘haunted’ apartment in Mumbai bollywood news  SAKAL
मनोरंजन

Nargis Fakhri: हिल रोडवर स्मशानभुमीजवळ... नर्गीस फाखरीला मुंबईत भुताटकीचा विचित्र अनुभव

नर्गीसला मुंबईत हिल रोडवर राहत्या घरी भुताटकीचा विचित्र अनुभव आला

Devendra Jadhav

Nargis Fakhri Haunted Experience News: बॉलीवूडची रॉकस्टार गर्ल म्हणजे नर्गीस फाखरी. नर्गीसने बॉलीवुडमधील मोजक्याच सिनेमांमधुन दर्जेदार भुमिका साकारल्या आहेत. नर्गीसने तिच्या पहिल्याच रॉकस्टार सिनेमातुन संपुर्ण इंडस्ट्रीला तिची दखल घ्यायला लावली.

नुकतंच रणबीरने एका मुलाखतीत तिला मुंबईत आलेल्या भुताटकीचा अनुभव सांगीतला. नर्गीसने सांगीतलेला हा अनुभव अंगावर काटा आणणारा आहे.

(Nargis Fakhri recalls living in a ‘haunted’ apartment in Mumbai bollywood news)

नर्गीस मुंबईत शिफ्ट झाली आणि...

न्यूयॉर्कमध्ये वाढल्यानंतर पुढे युरोप आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये स्थलांतर केलं. याशिवाय अभिनेत्री होण्यासाठी नर्गिस फाखरी भारतात स्थायिक झाली. ती म्हणाली की पहिल्या दोन दिवसांसाठी, ती तिची तात्पुरती राहण्याची जागा सोडण्याचे धाडस करू शकली नाही.

भारतात आल्यावर ती भाड्याने ज्या जागेत राहत होती, ती जागा सोडताना तिला सुरुवातीला वाईट वाटले. पण नंतर स्वतःचं घर घेतल्याने ती आनंदी होती. नर्गीस जेव्हा स्वतःच्या घरात शिफ्ट झाली तेव्हा तिला जाणवले की काहीतरी चुकीचं आहे.

स्मशानभूमीच्या शेजारी नवीन घर

मॅशेबल मिडल इस्ट या मिडीयाला दिलेल्या मुलाखतीत नर्गिसने सांगितले की, तिचं नवीन घर स्मशानभूमीच्या शेजारी होतं.

याशिवाय तिला नवीन घरात विचित्र घटनांचा अनुभव आला ज्यामुळे तिला राहतं घर सोडण्यास भाग पाडले. “मला एक अपार्टमेंट मिळाले, ते हिल रोडवर, स्मशानभूमीजवळ होते. मी फक्त तीन दिवस टिकले,” असं नर्गिस म्हणाली.

रात्री पडत असलेलं विचित्र स्वप्न

नर्गिसने तिची कहाणी पुढे सांगितली, “मला रात्री विचित्र स्वप्न पडायचे आणि पहाटे ३ वाजता अचानक झोपेतुन जाग यायची. स्वप्न खूप भीतीदायक असायचे. भुतासारखा दिसणारा माणूस होता.

तो 6 फूट 5, पांढरा, फिकट, भितीदायक माणूस होता जो मला स्मशानात घेऊन जातोय. मग तो स्मशानात हाताने खणायचा, आणि मग माणसांची हाडे बाहेर काढायचा आणि मांस खायचा आणि मला काही खायला सांगायचा. असे स्वप्न मला सलग चार दिवस पडले.”

घरात सहा पक्षी मेले आणि...

पुढे नर्गिसने तिच्या ‘टीम’ला तिला दिल्लीला आणण्यास सांगितले. पुढे नर्गीस मुंबईतुन दिल्लीत गेली. पण नंतर, जे लोक तिचं सामान पॅक करण्यासाठी आणि तिच्या वस्तू गोळा करण्यासाठी आले होते त्यांनी तिला सांगितले की, त्या लोकांना तिच्या कॅबिनेटमध्ये 'सहा मृत पक्षी' सापडले आहेत. "हे खुप विचित्र होते? माझ्या घरात काय सुरु आहे याची मला कल्पना नव्हती,” असं नर्गीस म्हणाली.

नर्गिसने हे देखील उघड केले की त्या अपार्टमेंटमध्ये तिच्याकडे काम करणाऱ्या मोलकरणीने तिचे तिचे दागिने चोरले. रॉकस्टार, मद्रास कॅफे आणि मैं तेरा हीरो अशा चित्रपटांमधील भूमिकांसाठी नर्गिस प्रसिद्ध आहे. याशिवाय स्पाय या हॉलिवूड चित्रपटातही ती दिसली होती. एकुणच नर्गीसने अंधश्रद्धेचं समर्थन न करता तिला आलेला अनुभव सांगीतला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना, काही जण अडकल्याची भीती; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Nagpur Leopard Rescue : इंजेक्शन मारलं अन् जाळीत पकडलं; भरवस्तीत शिरलेला बिबट्या जेरबंद, रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक घटनाक्रम

Kitchen Hacks: हिवाळ्यात सहज सेट होईल मलाईदार दही; जाणून घ्या एकदम सोपा घरेलू उपाय

Stree Mukti Parishad : स्वातंत्र्याचा वारसा सांभाळणे काळाची गरज; धार्मिक बंधनेच महिलांवरील अत्याचारांचे मूळ: लीलाताई चितळे

फक्त दीड लाख लोकसंख्या असलेला देश फीफा वर्ल्डकपसाठी पात्र; प्रशिक्षकाच्या अनुपस्थितीत घडवला इतिहास

SCROLL FOR NEXT