naseeruddin and ratna pathak 
मनोरंजन

Naseeruddin Shah : अफलातून नसीरुद्दीन शहा ! रत्ना पाठक आल्या आयुष्यात

अफलातून नसीरुद्दीन शहा

सकाळ डिजिटल टीम

अभिनेता नसीरुद्दीन शहा हे अफलातून कलाकार आहे. ते आपली भूमिका प्रामाणिकपणे निभवत असतात. त्यांनी आतापर्यंत करिअरमध्ये शंभरपेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांची प्रत्येक भूमिका अनोखी आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर नसीर साहेबांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नसीरुद्दीन शहाने आपल्या करिअरची सुरुवात पाकिस्तानी सिनेमातून केली होती. त्यांच्या अभिनय गुणांचा जग कौतुक करत आहे. नसीरुद्दीन शहा यांचे वैयक्तिक आयुष्यही फार कुतूहलाचे आहे. नसीरुद्दीन शहा (naseeruddin Shah) यांचा विवाह रत्ना पाठक (Ratna Pathak) यांच्याशी झाला. रत्ना याही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. या दोघांची जोडी चाहत्यांना खूपच आवडते. तर चला जाणून घेऊ त्यांची प्रेम कहानी... (naseeruddin Shah Celebrate His Birthday, Got Married With Ratna Pathak)

नाटका दरम्यान झाली भेट

रत्ना पाठक आणि नसीरुद्दीन शहा यांची भेट महाविद्यालयात झाली होती. मग पुन्हा त्यांची भेट नाटकादरम्यान झाली. या नाटकात दोघांनीही पहिल्यांदा एकत्र काम केले होते. एका चर्चेत स्वतः रत्ना पाठक यांनी याबाबत उल्लेख केला होता, की त्यांचा आणि नसीर साहेब यांचे प्रेम पहिल्या नजरेत झाले नव्हते. जेव्हा आम्हाला दिग्दर्शकाने आम्हा दोघांना भेटवले, तेव्हा मी त्यांचे नावही ऐकून नव्हते. पहिल्या दिवशी सर्वकाही सामान्य होते. मात्र दुसऱ्या दिवसापासून आम्ही एकमेकांबरोबर वेळ व्यतीत करण्यास सुरु केले.

लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला

या नाटकानंतर दोघांनीही एकमेकांबरोबर बरेच काम केले आणि हळूहळू एकमेकांजवळ येऊ लागले. पुन्हा काही काळानंतर दोघेही लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. १९८२ पर्यंत लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर रत्ना आणि नसीरुद्दीन शहाने खूप साध्या पद्धतीने नोंदणीने विवाह केला. मात्र पूर्वीही नसीर साहेब अगोदरही प्रेमात पडले होते. रत्ना पाठक यांच्यापूर्वी नसीरुद्दीन शहांनी स्वतःपेक्षा १५ वर्षांनी मोठ्या मनारा सिकरीच्या प्रेमात पडले होते. त्या दिवंगत अभिनेत्री सुरेखा सीकरी यांची बहीण होती. त्यावेळी नसीर साहेब यांचे वय केवळ २० वर्ष होते. कुटुंबाविरोधात जाऊन दोघांनी विवाह केला. मात्र एक वर्षानंतर नात्याची ताटातूट झाली. नंतर त्यांनी रत्ना पाठकबरोबर प्रेम झाले. काही काळानंतर नसीरुद्दीन शहा यांची पहिली पत्नी परवीन यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांची मुलगी हिबा रत्ना पाठक आणि नसीर साहेब यांच्याबरोबरच राहते.

आज मित्रासारखे राहत आहे

नसीर आणि रत्ना यांचे दोन मुले विवान आणि इमाद शहा आहेत. दोघेही चित्रपट उद्योगात काम करत आहेत. नसीर साहेब आणि रत्ना पाठक सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत. आमच्यातील नाते खूप घट्ट आहे. आम्ही दोस्ती आणि समानतेने वागतो. ती आमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट असल्याचे रत्ना पाठक यांनी सांगितले. आम्ही एकमेकांचे चांगले दोस्त बनलो आणि आजही आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Relations: ''भारत-रशिया मिळून दहशतवादाला चोख उत्तर देणार'', परराष्ट्र मंत्र्यांचा रशियातून इशारा

Farmer ID : फार्मर आयडी नोंदणीत गोंधळ; सातबारा एकाचा, आधार लिंकिंग दुसऱ्याचे!

MP Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Maharashtra Latest News Update: विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीची खोपोली ते कुसगाव या मिसिंगलिंक प्रकल्पास भेट

Mokhada News : जगण्यासाठी छळ, मरणानंतर यातना; मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबाचे दुष्टचक्र

SCROLL FOR NEXT