Naseeruddin Shah Comment On Bollywood  esakal
मनोरंजन

Naseeruddin Shah : 'हिंदी चित्रपट पाहणं बंद केलं, यापुढील काळात बॉलीवूडला...' नसिरुद्धीन शहा पुन्हा भडकले!

प्रसिद्ध अभिनेते नसिरुद्दीन शहा (Naseeruddin Shah on bollywood) यांनी पुन्हा एकदा बॉलीवूडच्या दिग्दर्शकांवर आगपाखड केली आहे.

युगंधर ताजणे

Naseeruddin Shah news: प्रसिद्ध अभिनेता नसिरुद्धीन शहा हे नेहमीच त्यांच्या परखड वक्तव्यासाठी ओळखले गेलेले सेलिब्रेटी आहेत. आपल्या वक्तव्यामुळे त्यांना अनेकदा ट्रोलही व्हावे लागले आहे. कुणाची पर्वा न (Naseeruddin Shah latest news) करता बिनधास्त आपल्या परखडपणाचा प्रत्यय त्यांनी करुन दिला आहे.

आता त्यांनी बॉलीवूड आणि बॉलीवूडचे चित्रपट निर्माते यांच्यावर (Naseeruddin Shah on bollywood) आगपाखड केली आहे. आपण हिंदी चित्रपट पाहणे बंद केल्याचे त्यांनी म्हटले आहे. येत्या काळात त्यांचा डिझ्नी हॉटस्टार वर शोटाईम नावाच्या सीरिजमध्ये ते दिसणार आहेत. त्याच्या एका इव्हेंटमध्ये ते सहभागी झाले होते. त्यात त्यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

मी हिंदी चित्रपट पाहणे बंद केलं आहे...

शहा म्हणाले की, मला खूप वाईट वाटते जेव्हा तुम्ही म्हणता की, हिंदी (Bollywood Latest news) सिनेमाला शंभर वर्ष पूर्ण झाल्याचा गर्व वाटतो. मात्र एक गोष्ट आपल्या लक्षात येत नाही ती म्हणजे आपण गेल्या कित्येक वर्षांपासून त्याच त्याच प्रकारचे चित्रपट तयार करत आहोत. त्यामुळे मी आता हिंदी चित्रपट पाहणे बंद केले आहे. मला ते चित्रपट अजिबात आवडत नाहीत.

लोकं जर त्याच प्रकारचे चित्रपट पाहणार असतील तर मला नाही वाटत त्यावर काही मार्ग निघेल. त्यामुळे जे कुणी गंभीर विषयावर चित्रपट तयार करत असतील त्यांनी यापुढील काळात आपल्यासमोर कोणती आव्हानं आहेत याचा विचार करण्याची गरज आहे. त्यांनी आपल्या चित्रपटातून सत्य दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

नसिरुद्धीन शहा यांनी त्यांच्या शैलीत सांगितलं की, मला माहिती आहे मी असे काही रोखठोकपणे बोललो की, लोकं माझ्याविरोधात कोणता तरी फतवा जाहीर करतील. नाही तर माझ्याविरोधात ईडीची चौकशी सुरु करतील. अशा अंदाजात त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. नसिरुद्धीन शहा यांच्या आगामी प्रोजेक्टविषयी बोलायचे झाल्यास त्यांचा २०२३ मध्ये कुत्ते, ताज, सास बहू और फ्लेमिंगो सारखे प्रोजेक्ट समोर आले होते. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद देखील मिळाला होता.

गेल्या काही दिवसांत नसिरुद्दीन शहा यांच्या वेबसीरिजमधील परफॉर्मन्सचे कौतुक होताना दिसत आहे. आगामी काळात ते वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

Solapur Crime: सोलापुरात धक्कादायक प्रकार! डॉ. वळसंगकरांचे जावई सुजय फडकेविरुद्ध ‘पोक्सो’, पोलिसांत गुन्हा; अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन्‌ छळाचा आरोप

PMOS वर घरगुती उपाय शोधताय? अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली 'या' पाण्याची हेल्थ टिप, नक्की ट्राय करा

Gadhphara Treasure: या किल्ल्यात रात्री खजिना शोधायला येतात पर्यटक! JCB चालकाला सापडलेल्या सोन्याच्या ४ घागरी, काय आहे रहस्य?

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT