Karishma Sharma and Vivaan Shah Relationship esakal
मनोरंजन

Karishma-Vivaan Shah: 'तुम्ही ऐकलं ते खरं आहे, ब्रेक अप झालंय'! नसिरुद्दीन शहाचा मुलगा विवान अन् करिश्माच्या नात्यात दुरावा

आपल्या आक्रमक भूमिकेसाठी, परखड वक्तव्यासाठी आणि वेगळ्या धाटणीच्या अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या नसिरुद्धीन शहा यांचा चाहतवर्ग मोठा आहे.

युगंधर ताजणे

Karishma Sharma and Vivaan Shah Relationship: टीव्ही मनोरंजन विश्वातील एक मोठी घडामोड आता समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते नसिरुद्धीन शहा यांचा मुलगा विवान शहा आणि करिश्मा शर्मा यांचे ब्रेक अप झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

आपल्या आक्रमक भूमिकेसाठी, परखड वक्तव्यासाठी आणि वेगळ्या धाटणीच्या अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या नसिरुद्धीन शहा यांचा चाहतवर्ग मोठा आहे. वयाची सत्तरी ओलांडली तरी त्यांचा काम करण्याचा आवाका, उत्साह हे नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी असल्याचे दिसून आले आहे. अशातच नसिरुद्दीन हे आता वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले आहे.

Also Read - हॅप्पी हार्मोन...

संगीत, टीव्ही, वेबसीरिज आणि चित्रपटांमध्ये काम केलेली करिश्मा ही गेल्या दोन वर्षांपासून नसिरुद्धीन शहा यांच्या मुलाला अभिनेता विवानला डेट करत असल्याच्या बातम्यांना उधाण आले होते. आता त्यांच्या ब्रेक अपच्या बातम्यांनी वेगळ्याच चर्चा सुरु झाल्या आहेत. यासगळ्यावर करिश्माची देखील प्रतिक्रिया देखील समोर आल्याचे सांगण्यात आले आहे. ती काय म्हणाली हेही जाणून घेणार आहोत.

हो तुम्ही ऐकलं तरी खरं आहे, आमचं ब्रेक अप झालं आहे. आमच्या आयुष्यात खूप चढउतार येत आहे. आम्हाला अजून खूप लांबचा प्रवास करायचा आहे. अशावेळी नवीन संधीच्या शोधात आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी करिश्मानं भावूक होत दिलेल्या त्या प्रतिक्रियेनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. काहीवेळेला काही गोष्टी योग्य त्या वेळेत थांबवलेल्या चांगल्या असे करिश्माचे म्हणणे आहे.

विवानच्या फिल्मी करिअरविषयी बोलायचे झाल्यास तो पहिल्यांदा २०११ मध्ये आलेल्या सात खून माफमध्ये दिसला होता. त्यानंतर त्यानं २०१४ मध्ये आलेल्या हॅप्पी न्यू इयरमध्ये देखील काम केले होते. २०१५ मध्ये बॉम्बे वेलवेट, २०१७ मध्ये लाली की शादी में लडडू दिवाना आणि २०२० मध्ये कबानी द कोईन तसेच २०२३ मध्ये कोट नावाच्या चित्रपटात त्यानं काम केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharia law : 'सत्तेत आल्यास देशात शरिया कायदा लागू करणार, हिंदूंसह मुस्लिमांना देणार अधिकार'; फैजुल करीम यांचं वादग्रस्त विधान

Shaktipeeth Highway : सतेज पाटील, राजू शेट्टींचे ‘शक्तिपीठ’विरोधात विठ्ठलाला साकडे

Ashadhi Wari 2025 : पुण्याहून पंढरपूरसाठी ३२५ अतिरिक्त बस, गाड्या शनिवारी, रविवारी धावणार; नियंत्रण कक्ष स्थापन

Maharashtra Education : विधान परिषदेत शिपायाच्या कंत्राटी पदावरून पेच; सत्ताधारी शिक्षक, पदवीधर आमदारांनीच केला सभात्याग

Ashadhi Ekadashi 2025: मुखात तुझे नाव, डोळ्यात तुझे गाव;डिगडोहमध्ये ‘विठ्ठल रखुमाईचा दर्शन सोहळा, माऊली ग्रुपचा उपक्रम

SCROLL FOR NEXT