national award winner Savani Ravindra debut in telagu film music  sakal
मनोरंजन

सावनी रविंद्रचा दक्षिणात्य अंदाज.. 'या' तेलुगू चित्रपटात गायले गाणे..

राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रवींद्रने आता तेलुगू चित्रपटात पदार्पण केले आहे.

नीलेश अडसूळ

Savani Ravindra : जिच्या आवाजाने मराठी प्रेक्षक कायमच मंत्रमुग्ध होत आला आहे अशी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गायिका सावनी रविंद्र (Savaniee Ravindrra) आता दाक्षिणात्य प्रेक्षकांनाही वेड लावणार आहे. एका तेलुगू चित्रपटात सावनीने गाणे गेले ससून याबाबत माहिती देणारी एक पोस्ट तिने इंस्टाग्राम अकाउंटला शेअर केली आहे. (national award winner Savani Ravindra debut in telagu film music)

'सदा नन्नु नडिपे' असे या तेलुगू चित्रपटाचे नाव असून चित्रपटाचं टायटल ट्रॅक नुकतचं रिलीज झालं आहे. या चित्रपटात सावनीने बरीच गाणी गायली आहेत. त्या[पैकी टायटल ट्रॅक तर चांगलेच पसंतीस उतरले आहे. यापूर्वी सावनीने मराठी, हिंदी, गुजराती, तमिळ, मल्याळम, कन्नडा, कोंकणी अशा प्रादेशिक भाषांमध्ये गाणी गायली आहेत.

सावनी तेलुगू संगीत क्षेत्रातील पदार्पणाविषयी सांगते, ‘मी सावनी ओरीजनल सिरीजमधून अनेक भाषेत गाणी गायली आहेत. यापूर्वी मी तेलुगू भाषेतील गाणी आणि जिंगल्स गायली होती. यावेळेस मी पहिल्यांदाच तेलुगू चित्रपटासाठी गाणी गायली आहेत. तेलुगू गाणं गाण्यासाठी मी तेलुगू भाषा शिकले. साऊथच्या कोणत्याही भाषा गाताना खूप चॅलेंजिंग असतं. या भाषा समजायला आणि बोलायला अवघड असतात. परंतु, मी याआधी तमिळ, मल्याळम गाणी गायली आहेत. ती गाणी रेकॉर्ड करण्याआधी मी साऊथमधील विविध गाणी सातत्याने ऐकली होती. त्यामुळे या चित्रपटातील तेलुगू गाणी गाताना मला थोडं सोप्पं गेलं. या गाण्यांमध्ये बऱ्यापैकी संस्कृत शब्द आहेत.’

तेलुगू गाण्यांच्या रेकॉर्डिंगविषयी बोलताना ती सांगते, ‘संगीत दिग्दर्शकाने हैदराबादवरून मुंबईत येऊन तब्बल दोन दिवसांत माझ्याकडून या तेलुगू चित्रपटातील सर्व गाणी रेकॉर्ड करून घेतली. त्यातील एक गाणं अरमान मलिकचं आहे. एक गाणं माझं आहे. एका गाण्यात मी आणि शुभंकरने डुएट गायले आहे. या गाण्यातील सर्व इमोशन्स, ताल, सूर यांकडे त्यांनी बारकाईने लक्ष दिले आहे. या गाण्यांचे रेकॉर्डींग खेळीमेळीच्या वातावरणात मुंबईमध्ये पार पडले. हा चित्रपट २४ जून रोजी हैदराबाद मध्ये प्रदर्शित होणार आहे’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT