राष्ट्रीय पुरस्कार sakal
मनोरंजन

राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माते यांच्या प्रतिक्रिया

माझ्या चाहत्यांचेदेखील आभार मानतो

सकाळ वृत्तसेवा

अजय देवगण : मला 68 व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये तानाजी-द अनसंग वॉरियरसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्याने आनंद झाला आहे. मी सर्वांचे आभार मानतो.

तसेच माझ्या चाहत्यांचेदेखील आभार मानतो. या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत, निर्माते टी सीरिज आणि माझे सहकलाकार यांच्याबरोबर हा सन्मान शेअर करतो.

किशोर कदम : गोदाकाठ आणि अवांचित या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, त्याबद्दल मला खूप आनंद आहे. मात्र एक खंत आहे की, नटरंग, फँड्री, जोगवा,टुरिंग टॉकीज अशा काही चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नाही. राष्ट्रीय पातळीवर या चित्रपटांची दखल घेतली गेली नाही. मात्र, आता एक नव्हे तर दोन चित्रपटांची दखल घेण्यात आली याचा मला खूप आनंद आहे.

रमेश दिघे (फनरल चित्रपट निर्माते) ः चित्रपटसृष्टीची मला काहीही माहिती नव्हती. केवळ जिद्द, आवड आणि धाडस मी केले. सन २०१० पासून मी या चित्रपटाच्या कथेवर

काम करीत होतो आणि मला हा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला याचा आनंद खूप झाला आहे. माझी इच्छाशक्ती मोठी होती आणि फनरल चित्रपटाच्या संपूर्ण टीमने खूप

मेहनत घेतली. त्या मेहनतीचे आम्हाला हे फळ मिळालेले आहे. या पुरस्कारामुळे माझ्या आईला खूप खूप आनंद झाला आहे. माझा मित्र हिरा पासलकर याला श्रद्धांजली

म्हणून मी हा पुरस्कार समर्पित करतो.

सिद्धार्थ मेनन (अभिनेता) ः जून हा चित्रपट माझ्यासाठी खूप अवघड होता. या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले. परंतु आता मला मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी खूप

महत्त्वाचा आहे. आपण दररोज उठतो. एक स्वप्न पाहतो आणि अचानक अशी आनंदाची बातमी येते तेव्हा जो आनंद होतो तो शब्दात मांडणे कठीण असते.

अक्षय बर्दापूरकर (निर्माते- गोष्ट एका पैठणीची) ः मी सर्वप्रथम आभार मानतो. या चित्रपटाचा मुख्य विषय एक स्वप्न पूर्ण करण्याचा आहे. आणि स्वप्नांचा पाठलाग करून स्वप्न

पूर्ण करणं. आणि आज खऱ्या अर्थाने स्वप्न पूर्ण करणाऱ्या चित्रपटातून माझं स्वप्न पूर्ण झालं. राष्ट्रीय पुरस्कार हा सर्वात मोठा पुरस्कार आणि माझ्यासारख्या एका नवीन फिल्म

मेकरला मिळाला, त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. आणि हा मी पुरस्कार माझ्या संपूर्ण टीमला आणि या चित्रपटाची नायिका सायली संजीवच्या वडिलांना समर्पित

करतो. आज ते या जगात नाहीत.

निखिल महाजन ( जून चित्रपट दिग्दर्शक) ः मला प्रचंड आनंद झाला आहे. माझ्या खूप जवळचा चित्रपट. कारण मी औरंगाबादचा आणि तेथेच आम्ही हा चित्रपट शूट केला.

त्यातच हा चित्रपट बनविणे खूप अवघड होते. कारण या चित्रपटाचे शूटिंग संपले आणि लाॅकडाऊन लागले. पोस्ट प्राॅडक्शन आम्ही ता काळात केले. हा चित्रपट प्लॅनेट

मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाला आणि त्याला प्रचंड प्रतिसाद लाभला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT