Shreyas Talpade: Esakal
मनोरंजन

Shreyas Talpade Birthday: श्रेयस तळपदे नॅशनल क्रश तृप्ती डिमरीचा 'गॉडफादर'! काय आहे दोघांचं कनेक्शन?

बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदेचा आज वाढदिवस

सकाळ डिजिटल टीम

Shreyas Talpade: बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदेचा आज वाढदिवस.अलीकडेच श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली. अक्षय कुमारसोबत 'वेलकम टू द जंगल' चित्रपटाचे शूटिंग करून श्रेयस घरी परतल्यानंतर अचानक श्रेयसची प्रकृती बिघडली आणि तो बेशुद्ध झाला.

यानंतर पत्नी दीप्तीने त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. श्रेयसची रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

मात्र तुम्हाला माहित आहे का की श्रेयस तळपदेचा थेट संबंध 'अ‍ॅनिमल' फेम अभिनेत्री तृप्ती डिमरीशी आहे. इतकच नाही तर श्रेयस तळपदेला तृप्ती डिमरीचा गॉडफादर म्हटले जाते. सध्या सोशल मिडियावर याची चर्चाही सुरु आहे. श्रेयस तळपदेचे तृप्ती डिमरीशी खास नाते आहे.

'अ‍ॅनिमल'फेम व्हायरल अभिनेत्री तृप्ती डिमरी हिला बॉलीवूडमध्ये इतर कोणी नाही तर अभिनेता श्रेयस तळपदेने आणले आहे. तिचा पहिला चित्रपट 'पोस्टर बॉईज' होता. या चित्रपटाचा श्रेयस सहनिर्माता आणि दिग्दर्शक होता.

या चित्रपटात श्रेयस तळपदेच्या गर्लफ्रेंडची भूमिका तृप्तीनं साकारली होती. तृप्तीला श्रेयसने बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी दिली असे बोलले जाते. या चित्रपटात बॉबी देओल आणि सनी देओल देखील मुख्य भूमिकेत होते.

तृप्तीने श्रेयस आणि बॉबीसोबत काम केले होते. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करु शकला नाही. बॉबी आणि श्रेयस खुप जवळचे मित्र आहे. दोघांचा वाढदिवसही एकाच दिवशी येतो.

अ‍ॅनिमल' पुर्वी तृप्ती बाबिल खानसोबत 'कला' चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. यासोबत ती इम्तियाज अलीच्या 'लैला मजनू' या चित्रपटात दिसली. अॅनिमल चित्रपटाने तिला रातोरात प्रसिद्धी मिळाली.

तर श्रेयस तळपदेने बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो खुप लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने 'इकबाल', 'अपना सपना मनी मनी', 'ओम शांती ओम', 'गोलमाल रिटर्न्स', 'गोलमाल 3', 'हाऊसफुल 2' आणि 'गोलमाल अगेन'सह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. श्रेयस लवकरात लवकर बरा व्हावा अशी प्रार्थना चाहते करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT