National Film Awards  Esakal
मनोरंजन

National Film Awards : दिल्लीत मराठी चित्रपटांचा डंका ‘एकदा काय झालं’ चित्रपटातील अभिनेत्यांचा सन्मान

‘सरदार उधम’ हा हिंदीमधील सर्वोत्कृष्ट स‍िनेमा ठरला. ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘सरदार उधम’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट,

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

नवी दिल्ली - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे मंगळवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.‘नर्गीस दत्त राष्ट्रीय एकात्मता श्रेणी’तील पुरस्कार ‘दि काश्मीर फाइल्स’ या चित्रपटास तर सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या श्रेणीत ‘थ्री टू वन’ या मराठी सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लांबलेल्या २०२१ मधील पुरस्कारांचे वितरण मंगळवारी करण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळ्यात ‘गोदावरी’, ‘थ्री टू वन’, ‘रेखा’ या मराठी चित्रपटांना विविध श्रेणींमध्ये गौरविण्यात आले.

हिंदी सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. फिचर फिल्ममध्ये ३२ श्रेणींत पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात आले तर ‘नॉन फिचर फिल्म’मध्ये विविध २४ श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले.

‘सरदार उधम’ हा हिंदीमधील सर्वोत्कृष्ट स‍िनेमा ठरला. ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘सरदार उधम’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी, सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनर, सर्वोत्कृष्ट निर्मिती डिझाइन आणि सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफी: री-रेकॉर्डिंग या श्रेणींत राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार ‘पुष्पा’ या तेलुगू चित्रपटासाठी अल्लू अर्जुन यांना प्रदान करण्यात आला.

आलिया भट, क्रिती सेनॉनचा गौरव

सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार दोन अभिनेत्रींना प्रदान करण्यात आला. ‘गंगूबाई काठ‍ियावाडी’ या चित्रपटासाठी आल‍िया भट, तर ‘मिमी’ या चित्रपटासाठी क्रिती सेनॉन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट सहअभिनेत्याचा पुरस्कार ‘मिमी’ या हिंदी सिनेमासाठी पंकज त्रिपाठी यांना, तर सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार पल्लवी जोशी यांना ‘दि काश्मीर फाइल्स’ या चित्रपटासाठी प्रदान करण्यात आला. गोदावरी’ या चित्रपटासाठी निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : सूर्यकुमार यादवसाठी दरवाजे अजूनही खुले... माजी कर्णधाराचे टीम इंडियात पुनरागमन शक्य... जाणून घ्या, कसं!

Wari Accident: जेजुरी अपघातानंतर आरोग्य विभागाची युद्धपातळीवर धाव; मृत वारकऱ्यांचे पार्थिव मूळ गावी पोहोचवण्याची शासनाची व्यवस्था

Latest Marathi News Live Update : जून २०२६ मधील ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाईचा दर ४.३८% आहे

IND vs ENG 1st ODI: भारत-इंग्लंड सामन्याची वेळ काय?... जाणून घ्या कधी, कुठे अन् कोणत्या चॅनेलवर पाहाल फ्री LIVE मॅच...

IND vs ENG: 'Lords' वर देव! भारतीय महिला खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी पोहोचला सचिन तेंडुलकर Video

SCROLL FOR NEXT