national film awards 2021 live updates full list of winners 
मनोरंजन

National Film Awards 2021 LIVE : सुशांतच्या 'छिछोरे' ला राष्ट्रीय पुरस्कार

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - सर्वांना उत्सुकता असणा-या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या अॅवॉर्डविषयी उलट सुलट चर्चेला तोंड फुटले होते. यंदा ज्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ठ चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे त्याचे नाव तुम्ही ऐकल्यास तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्यावाचून राहणार नाही. दिवंगत अभिनेता सुशांतसिंगच्या छिछोरे चित्रपटाला बेस्ट फिल्मचा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या चित्रपटाला कोणते निकष लावून नॅशनल अॅवॉर्ड देण्यात आल्याचा प्रश्न अनेकांनी सोशल मीडियावर विचारला आहे. याशिवाय वाचाळ अभिनेत्री कंगणालाही यंदा नॅशनल अॅवॉर्ड जाहीर झाला आहे. तिच्या मणिकर्णिका चित्रपटातील अभिनयामुळे तिला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचा 67 वा समारंभ सोमवारी पार पडला. दुपारी चार वाजता हा समारंभ पार पडला. त्यात पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. नॉन फिचर फिल्म पुरस्कारांची घोषणाही यावेळी करण्यात आली. त्यात बेस्ट नॅरेशन - वाईल्ड कर्नाटका, बेस्ट म्युझिक डायरेक्टर - विशाख ज्योती, सविता सिंह यांना सौंसी या चित्रपटासाठी बेस्ट सिनेमॅटोग्राफीचा अॅवॉर्ड मिळाला आहे. तसेच सुधांशु सरिया यांना नॉक, नॉक नॉक चित्रपटासाठी बेस्ट डिरेक्टरचे अॅवॉर्ड मिळाले आहे.

राधा या चित्रपटाला बेस्ट अॅनिमेशन फिल्मसाठी अॅवॉर्ड मिळालं आहे. तर बेस्ट नॉन फिचर फिल्मसाठी - एन इजीनिअर्ड ड्रीमला गौरविण्यात आले आहे. फिचर फिल्मसाठीचे पुरस्कारही यावेळी घोषित करण्यात आले आहेत. त्यात स्पेशल मेशंन - बिरीयानी (मल्याळम), जोनाकी पोरवा (असमिया), लता भगवानकरे आणि पिकासो (मराठी) बेस़्ट फिचर फिल्ममध्ये छोरियां छोरों से कम नहीं (हरियाणवी), भुलन दी मेज (छत्तीसगढी), बेस्ट तेलुगु फिल्म- जर्सी, बेस्ट तमिल फिल्म- असुरन, बेस्ट पंजाबी फिल्म- रब दा रेडियो 2, बेस्ट मलियाली फिल्म- कला नोत्तम, बेस्ट मराठी फिल्म- बारडो


 बेस्ट फीमेल प्लेबॅक साठी सावनी रवींद्र यांना बारडो या चित्रपटातील रान पेटलं या गाण्यासाठी नॅशनल अॅवॉर्ड मिळालं आहे.  बेस्ट मेल प्लेबॅक- पी प्राक यांना फिल्म केसरी चित्रपटातील गाने तेरी मिट्टीसाठी  बेस्ट एक्ट्रेस- कंगना राणावत फिल्म पंगा और मणिकर्णिका,  बेस्ट एक्टर- मनोज बाजपेयी भोसले, असुरनसाठी धनुष, बेस्ट डायरेक्टर- संजय पूरे सिंह चौहान यांना भट्टर हूरेन चित्रपटासाठी.

बेस्ट पॉप्युलर फिल्म- महर्षि, इंदिरा गांधी अवॉर्ड फॉर बेस्ट डेब्यू फिल्म ऑफ ए डायरेक्टर- हेलन (मलयालम) बेस्ट फीचर फिल्म- मलियाली फिल्म Marakkar Arabikkadalinte- SimHam ला मिळाला. नॅशनल मीडिया सेंटरमध्ये या पुरस्कार सोहळ्य़ाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावर कोरोनाचे सावट होते. आता ही सर्व माहिती पीआयबीच्या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आली आहे. 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT