Natu Natu Oscar 2023 esakal
मनोरंजन

Natu Natu Oscar 2023: 'नाटू नाटू' वाजलं 'ऑस्करचं पब्लिक' भारावलं! हे असं गाणं यापूर्वी...

गेल्या काही महिन्यांपासून आरआरआऱ आणि ऑस्कर या विषयावर वेगवेगळ्या प्रकारे चर्चा होताना दिसत होती.

सकाळ डिजिटल टीम

Natu Natu Oscar 2023 : नाटू नाटू गाण्याला ऑस्कर मिळाल्यानंतर भारतामध्ये आनंदोत्सव सुरु झाला आहे. भारतीय चित्रपट विश्वाच्या शिरपेचात मानचा तुरा खोवला गेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून आरआरआऱ आणि ऑस्कर या विषयावर वेगवेगळ्या प्रकारे चर्चा होताना दिसत होती. कित्येकांना यंदा इतिहासाची पुनरावृत्ती होणार का याची उत्सुकता होती. शेवटी नाटू नाटूनं सगळ्यांना जिंकून घेतलं आहे.

ऑस्करच्या मंचावर नाटू नाटू चे सादरीकरण झाले आणि त्यावेळी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी तो परफॉर्मन्स पाहिल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट केल्याचे दिसून आले आहे. बराचवेळ सुरु असलेला हा कडकडाट भारतीय चित्रपट विश्वासाठी मोठी आनंदाची बाब होती. तब्बल १४ वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर भारताला हा पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वी बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा लगान ऑस्करच्या शर्यतीत होता. मात्र त्यावेळी भारताच्या पदरी निराशा आली होती.

Also Read - नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

प्रसिद्ध संगीतकार ए आऱ रहमान यांच्या जय हो गाण्यानं भारतीयांच्या आशा पुन्हा एकदा ऑस्करच्या निमित्तानं पल्लवित केल्या होत्या. डॅनी बॉयल यांच्या स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटाला ८ ऑस्कर मिळाले होते, त्यात रहमान यांना बेस्ट साँग ओरिनजनल स्कोअरसाठी ऑस्करनं गौरविण्यात आले होते. रहमान यांना देखील जय हो गाणे सादर करण्याची संधी या सोहळ्यात मिळाली होती.

ऑस्कर अकादमीने २८ फेब्रुवारी रोजी ट्विट करत यंदाच्या ऑस्कर सोहळ्यामध्ये नाटू नाटूचे सादरीकरण केले जाणार यादसंदर्भात घोषणा केली होती. ऑस्कर सोहळ्यात 'नाटू नाटू' गाण्याचं लाइव्ह सादरीकरण केलं जाईल, अशी माहिती त्यांनी दिली होती. “राहुल सिपलीगुंज आणि काल भैरव ‘नाटू नाटू’ ९५ व्या अकादमी पुरस्कारात लाइव्ह,” असं या यापूर्वी व्हायरल झालेल्या ट्विट मध्ये म्हटलं होतं.

त्या ट्विटनंतर संगीतकार एमएम कीरावानी सध्या या सोहळ्यासाठी लाइव्ह सादरीकरणाची तयारी सुरू केली होती. ऑस्करच्या सोहळ्यामध्ये सादरीकरण होत असलेले हे गाणे उपस्थितांची दाद मिळवल्याशिवाय राहणार नाही. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. जेव्हा या गाण्याचे सादरीकरण करण्यात आले तेव्हा मात्र त्या गाण्यानं उपस्थितांना जिंकून घेतल्याचे दिसून आले आहे. त्यांनी या गाण्याला आणि त्याच्या सादरीकऱणाला उपस्थितांना टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT