natya sammelan 2024 pune president prashant damle speech on stage political statement SAKAL
मनोरंजन

Prashant Damle: "३६५ दिवस राजकारण्यांचा अभिनय सुरुच...", नाट्यसंमेलनाच्या व्यासपीठावरुन प्रशांत दामलेंची फटकेबाजी

नाट्यपरिषद अध्यक्ष प्रशांत दामलेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवारांसमोरच तुफान फटकेबाजी केलीय

Devendra Jadhav

100th Natya Sammelan News: शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा पुण्यात शुक्रवारी पार पडला. यावेळी पुण्यनगरीचा मानबिंदू असलेल्या बालगंधर्व रंगमंदिरापासून ते गणेश कला क्रीडा मंचापर्यंत ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत नाट्य यात्रा काढण्यात आली.

आज या नाट्यपरिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार उपस्थित होते. यावेळी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रशांत दामलेंनी सरकारसमोर गाऱ्हाणं मांडलंय.

नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, "जेष्ठ मंत्रीमंडळ बसले आहेत, आम्ही कलाकार तीन तास अभिनय करतो, पण २४ तास अभिनय करणारी मंडळी मंचावर आहे. ते ३६५ दिवस अभिनय करत असतात. नाट्य परिषद अध्यक्षपद मिळाल्याने मला मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटतेय. नाट्य परिषदेने तीन स्तरावर काम केलं पाहिजे. निधी वाटप व्यवस्थित झाला पाहिजे. त्याचा विनियोग व्यवस्थित झाला पाहिजे."

प्रशांत दामले पुढे म्हणाले, "महत्वाची जबाबदारी प्रेक्षकांची आहे, त्यांनी पुढच्या पिढीला नाटक बघण्याची सवय लावली पाहिजे. शासन त्याचं काम करत आहेत. नाट्यगृह जपण सोपं आहे,ती सुधारणं गरजेचे आहे, पण त्या ठिकाणी योग्य लोक बसवणे गरजेचे आहे. नाट्यगृह भाडे हा पण विषय महत्वाचा आहे. मुख्यमंत्र्यांनी कोरोना काळात फोनवरून भाडे कमी करून दिली होती."

पिंपरी चिंचवडच्या नाट्यगृहामध्ये जो जेवण्याचा हॉल आहे त्याला ५०० रुपये घेतले जातात. वीजबिल बाबत पण तोच विषय आहे. पण आज सगळे इथं आहे तर लक्ष घातले जावे. तुम्ही पैसे जास्त घेतले तरी येणार आम्ही इथं कारण आमचा नाट्य रसिक इथं आहे

प्रशांत दामले शेवटी म्हणाले, शासनाने दिलेला निधी योग्यरीत्या आपण वापरायला हवा. शासनाने आम्हाला योग्य त्या उपाययोजना पुरवाव्यात. रसिक प्रेक्षकांनी पुढच्या पिढीत नाटकाचा गोडवा निर्माण करावा. मुख्यमंत्री साहेब नाट्यगृह बांधणं आणि ती सांभाळणे सोपं आहे. अलीकडेच सांस्कृतिक मंत्री म्हणाले की आम्ही सत्तर नाट्यगृह बांधणार, हे ऐकून कलाकार मंडळी आनंदी झालोय. पण आहे ती नाट्यगृह योग्यरीत्या मेंटेन ठेवायला हवीत. नाट्यगृहाचे दर, लाईट बिल, सुविधांची वानवा आहे. त्यात सरकारने लक्ष घालावे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT