navardev marathi movie poster launch starring kshitish date makarand anaspure priyadarshini indalkar  SAKAL
मनोरंजन

Navardev Movie: 'बकासुर' आणि 'सुंदर' या बैलजोडीकडून 'नवरदेव'चं पोस्टर लॉंच

शेतकरी तरुणांच्या लग्नाची व्यथा मांडणारा नवीन मराठी सिनेमा

Devendra Jadhav

मराठी सिनेमांमध्ये नवनवीन मराठी सिनेमांची घोषणा होत आहे. धर्मवीर २ ची घोषणा काहीच दिवसांपुर्वी झाली. अशातच आणखी एका नव्या मराठी सिनेमाची घोषणा झालीय. हा सिनेमा म्हणजे नवरदेव.

मराठी मनोरंजन विश्वात पहिल्यांदाच एका बैलजोडीने पोस्टर लॉंच केलंय. बघूया काय आहे हा सिनेमा. आणि असणार सिनेमाची कथा.

(navardev marathi movie poster launch)

तमाम तरूणाईच्या अगदी मनाजवळचा विषय म्हणजे लग्न! सध्या सगळीकडे भरपूर लग्नाळू नवरदेव दिसतात मात्र त्यांना नवरी मिळत नाही. गावातील शेतकरी मुलांची परिस्थिती तर अजून बिकट आहे. हाच विषय मोठया पडद्यावर घेऊन येत आहेत दिग्दर्शक राम खाटमोडे! शेतकरी लग्नाळू तरूणांची कथा सांगणाऱ्या ‘नवरदेव B Sc. Agri.’ या चित्रपटाचं पहिलं पोस्टर आज प्रकाशित करण्यात आलं.

या चित्रपटाचा पोस्टर लॉन्च खूप आगळा-वेगळा होता, कारण बकासुर आणि सुंदर या बैलजोडीने हिरवा झेंडा दाखवत या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च केले. या चित्रपटात अभिनेता क्षितीश दाते नवरदेवाच्या भूमिकेत झळकणार आहे. पुण्यातील आर्यन्स वर्ल्ड स्कूलमध्ये हा पोस्टर लॉन्च सोहळा थाटामाटात संपन्न झाला. शेतीचं उत्तम शिक्षण घेतलेल्या महत्त्वाकांक्षी तरूणालाही लग्नासाठी कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं याची कथा या चित्रपटातून आपल्याला बघायला मिळणार आहे.

क्षितीश दाते, प्रियदर्शिनी इंदलकर, मकरंद अनासपुरे, गार्गी फुले, रमेश परदेशी, हार्दिक जोशी, नेहा शितोळे, संदीप पाठक अशा उत्तम कलाकारांची मांदियाळी या चित्रपटात आपल्याला दिसेल. आज प्रकाशित झालेल्या पोस्टरमध्ये क्षितीश मुंडावळ्या बांधून नवरीच्या प्रतिक्षेत असलेला दिसतोय... त्याला नवरी मिळणार की नाही याचं उत्तर आपल्याला २६ जानेवारीला चित्रपटगृहातच मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ३३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार अतिवृष्टी, महापुराची नुकसान भरपाई; सर्व जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल सादर

Prashant Kishor on Bihar Election: अखेर प्रशांत किशोर यांनी निवडणूक न लढवण्यामागचं नेमकं कारण सांगितलं, म्हणाले..

पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय! सोलापूर शहरात रात्री १२ ते पहाटे ५ पर्यंत नाकाबंदी; प्रत्येक पोलिस ठाण्याअंतर्गत एक विशेष पथक

Baidpura Violence : गोमांस विक्रीच्या संशयावरून दोन गट आमनेसामने; दोन्ही गटाकडून तक्रारी, अदखलप्राप्त गुन्हे दाखल

Pune Traffic : पुणे-सातारा बाह्यवळण मार्गावर दिवाळीच्या गर्दीत वाहतूक कोंडीचा कहर

SCROLL FOR NEXT