Navin Prabhakar new marathi movie raghuveer based on samarth ramdas swami sakal
मनोरंजन

Navin Prabhakar: खळखळून हसवणारा अभिनेता नवीन प्रभाकर खलनायकाच्या भूमिकेत..

लवकरच येतोय मराठी चित्रपट "रघुवीर"..

नीलेश अडसूळ

Navin Prabhakar: गायक, अभिनेता आणि कॉमेडियन अशी आपल्या मनोरंजन क्षेत्रातील वाटचाल करून "पैचान कौन" म्हणणारी ‘जुली - द बार गर्ल’ आणि ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर’ मधून घराघरात पोहोचलेला नवीन प्रभाकर आपल्या सर्वांना ठाऊक आहेच.

पण आता लोकांना मनसोक्त हसवल्यानंतर आता मात्र नवीन प्रभाकर खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. लवकरच नवीन 'समर्थ रामदास' यांच्या जीवनावर आधारित 'रघुवीर' चित्रपटात एका वेगळ्याच भूमिकेत समोर येणार आहे.

(Navin Prabhakar new marathi movie raghuveer based on samarth ramdas swami)

महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतात या भूमीला आपल्या ज्ञानाने पावन बनवणाऱ्या संतांमध्ये संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि रामदास यांची नावे प्रमुख आहेत. ह्यामध्ये महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या शिवाजी महाराजांचे समकालीन समर्थ रामदास ज्यांना छत्रपतींनी स्वतःचे मित्र , तत्वज्ञ आणि मार्गदर्शक म्हणून निवडले होते. त्याच समर्थ रामदास स्वामींच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर आपल्याला बघायला मिळणार आहे.

सिनेमास्टर्स एंटरटेनमेंट प्रस्तुत , समर्थ क्रिएशन्स निर्मित , डायनॅमिक प्रोडक्शन्स आणि आदित्यम क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने रामदास स्वामींवर आधारित चित्रपट " रघुवीर " लवकरच आपल्याला सिनेमागृहात बघायला मिळणार आहे. आणि महत्वाचे म्हणजे आपले लाडके कॉमेडियन नवीन प्रभाकर सुद्धा ह्यात फार महत्वाच्या भूमिकेत आपल्याला बघायला मिळणार आहेत.

आता नव्याने येऊ घातलेल्या " रघुवीर या मराठी सिनेमा मध्ये आपण नवीन प्रभाकरला आपण एका निगेटिव्ह भूमिकेत बघणार आहोत. कॉमेडियन म्हणून दिलखुलास हसवल्यानंतर एक गंभीर भूमिकेत सुद्धा प्रभाकरांनी चाहत्यांच्या मनावर छाप सोडली आता कॉमेडियन ते व्हिलन ह्या त्यांच्या प्रवासाचे साक्षीदार आपण बनणार आहोत.

नवीन प्रभाकरांबरोबरच चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत म्हणजेच समर्थ रामदासांच्या भूमिकेत आपण विक्रम गायकवाड ह्यांना बघणार आहोत , त्याच बरोबर चित्रपटामध्ये ऋजुता देशमुख, शैलेश दातार, विघ्नेश जोशी, राहुल मेहदेंळे, भूषण तेलंग, वर्षा दांदळे, मौसमी तोंडवलकर, अनुश्री फडणीस, निनाद कुलकर्णी, देव निखार्गे, गणेश माने ह्या गुणी कलाकारांची सुद्धा भूमिका आहे. एकंदरीत निलेश अरुण कुंजीर ह्यांचे दिग्दर्शन असलेला "रघुवीर" पॉवरपॅक परफॉर्मेन्स चा नजारा असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinhagad Road Traffic Jam : पुण्यातील सिंहगड रोडवर वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा, ऑफिसच्या दिशेने निघालेल्यांना मनस्ताप

Kolhapur Accident Video : कोल्हापूरमध्ये मद्यपी ट्रॅक्टर चालकाने वृद्ध महिलेला उडवलं; व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi Breaking News Live Update : नागपूरच्या भांडेवाडी परिसरात आढळला बिबट्या, वनविभागाच्या वेगवेगळ्या रेस्क्यू सुरु

MPSC Success : संघर्ष ते यशाचे शिखर! सायकलवर भंगार गोळा करणाऱ्या वडिलांच्या कन्येची MPSC त राज्यात पहिली झेप

Mumbai CNG Shortage: सीएनजी कोंडीतून मुंबईकरांची सुटका, पुरवठा सुरळीत होताच पंपांवर गर्दी; ३ दिवसात कोट्यवधींचं नुकसान

SCROLL FOR NEXT