navra maza navsacha 2 
मनोरंजन

Navra Mazha Navsacha 2: ‘नवरा माझा नवसाचा 2’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला; 'हे' कलाकार साकारणार भूमिका

'नवरा माझा नवसाचा' (Navra Mazha Navsacha) हा प्रेक्षकांचा ऑल टाइम फेवरेट असणारा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Navra Mazha Navsacha 2 : अभिनेता आणि चित्रपट दिग्दर्शक सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. सचिन पिळगावकर यांचे चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. सचिन पिळगावकर यांचा 'नवरा माझा नवसाचा' (Navra Mazha Navsacha) हा प्रेक्षकांचा ऑल टाइम फेवरेट असणारा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा करण्यात आली आहे. ‘नवरा माझा नवसाचा 2’ (Navra Mazha Navsacha 2) या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. सचिन पिळगावकर यांनी एक खास व्हिडीओ शेअर करुन ‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटाची घोषणा केली आहे.

सचिन पिळगावकर यांनी शेअर केला व्हिडीओ

सचिन पिळगावकर यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं, "सरप्राईज, 19 वर्षांनंतर येतोय ‘नवरा माझा नवसाचा 2' गणपती बाप्पा मोरया! शूटिंगला सुरुवात झाली आहे". सचिन पिळगावकर यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

पाहा व्हिडीओ:

'हे' कलाकार साकारणार भूमिका

सचिन पिळगावकर यांनी व्हिडीओ शेअर करुन ‘नवरा माझा नवसाचा 2' या चित्रपटाच्या स्टार कास्टची देखील माहिती दिली आहे. या व्हिडीओला त्यांनी चित्रपटातील कलाकारांना टॅग केलं आहे. ‘नवरा माझा नवसाचा 2' या चित्रपटात अशोक सराफ, सुप्रिया पिळगावकर, स्वप्निल जोशी, हेमल इंगळे, अली असगर, निर्मिती सावंत. निवेदिता सराफ, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

19 वर्षांनंतर येतोय ‘नवरा माझा नवसाचा 2'

‘नवरा माझा नवसाचा' हा चित्रपट 2005 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटातील कलाकारांच्या विनोदी शैलीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता 19 वर्षानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता ‘नवरा माझा नवसाचा 2' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi उद्यापासून टीम इंडियाच्या सीनियर संघासाठी पात्र ठरणार; IPL 2026 नंतर कोहली, रोहितसोबत खेळणार...

Kondhwa News : बोपदेव घाट उतारावर सातत्याने अपघात; प्रशासनाने गतिरोधक बसवण्याची नागरिकांची मागणी

farmer relief fund : विमा नसलेल्या बागांना हेक्टरी २२ हजारांची मदत; नुकसानग्रस्त बागायतदारांना शासनाकडून दिलासा

Electricity Bill Hike: सर्वसामान्यांना मोठा धक्का! वीज दरात वाढ करण्यास मंजुरी; आता प्रति युनिट किती रुपये मोजावे लागणार?

पेट्रोल पंपावर मिळणार दारू! नव्या अबकारी धोरणाला मंजुरी, प्रशासन म्हणते, सहज खरेदी अन् पारदर्शकतेसाठी निर्णय

SCROLL FOR NEXT