Navratri 'Garbo' Song Esakal
मनोरंजन

Navratri 'Garbo' Song: आता पंतप्रधानांच्या गाण्यावर होणार दांडिया ! खुद्द मोदींनी लिहिलेल्या गरब्याला 'या' गायिकेने दिलाय आवाज

Vaishali Patil

Navratri 'Garbo' Song: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीच आपल्या वेगवेगळ्या कौशल्याने सर्वांना आश्चर्यचकित करत असतात. आता त्यांनी गीत लेखनात आपला हात आजमावला आहे. होय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक गरबा गाणे लिहिले आहे.

गुजरातमध्ये नवरात्रीला वेगळचं महत्व आहे. गुजरातमध्ये नवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो आणि गरबा खेळण्याची परंपरा जपली जाते. हाच गुजरातच्या संस्कृतीचा अभिमान आणि वारसा नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या गाण्यातुन सांगण्यात आला आहे.

पीएम मोदींनी नवरात्रीच्या निमित्ताने हे गरबा गाणे लिहिले आहे. तर या गाण्याला आवाज दिलाय तो लोकप्रिय गायिका ध्वनी भानुशाली तर सुर दिले आहेत तनिष्क बागचीचे.

'गारबो' या गाण्याची निर्माती जॅकी भगनानीने केली आहेत. हे गाणे यूट्यूबवर रिलीज करण्यात आले आहे. हे गाणे रिलिज करताना यूट्यूब चॅनलने लिहिले की, 'पीएम मोदींनी लिहिलेल्या गाण्यासोबत 'गारबो'मध्ये पहिल्यांदाच तनिष्क बागचीच्या सूर आणि ध्वनी भानुशालीच्या आवाजाची जादू पाहायला मिळणार आहे.

नदीम शाह यांनी गाण्याचे दिग्दर्शन केले आहे. तर तुमची टीम , तुमचा दांडिया आणि घागरा तयार करा आणि 'गारबो' गाण्याचा आनंद घ्या.'

पंतप्रधानांनी लिहिलेले हे गाणे नवरात्रीच्या सणाबद्दल सांगते, जे विविध राज्यांतील लोकांना त्यांची संस्कृती आणि परंपरा आत्मसात करून एकत्र आणते.

जॅकी भागवानी म्हणाला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत या संगीत प्रकल्पाचा भाग असणे हा माझ्यासाठी आणि जेजस्ट म्युझिकसाठी खूप अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाण्याचा व्हिडीओ अशा प्रकारे तयार करून रिलीज करण्याची ही पहिलीच वेळ आहे. आता गारबा प्रेमींचा या गाण्याला कसा प्रतिसाद असेल हे पाहणे उत्सूकतेचे ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT