Nawazuddin Siddiqui News esakal
मनोरंजन

Nawazuddin Siddiqui : 'तसं झालं तर मी परत त्याची बायको होईल!' पण... नवाझुद्दीनच्या पत्नीची मोठी अट

प्रचंड संघर्ष करुन बॉलीवूडमध्ये स्वताची वेगळी ओळख निर्माण केलेल्या नवाझुद्दीनवर त्याच्या पत्नीनं बलात्काराचे आरोप केले होते.

सकाळ डिजिटल टीम

Nawazuddin Siddiqui Aaliya divorce case now time to settlement : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता नवाझुद्दीन सिद्धिकी हा त्याच्या वैवाहिक आय़ुष्यामुळे चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून तो आणि त्याची पत्नी आलिया सिद्धीकी यांच्यात जोरदार भांडणं सुरु आहे. त्यांच्यातील वाद सोशल मीडियावर देखील वेगानं व्हायरल झाली आहेत. नवाझुद्दीनच्या बाबत असे काही होईल याची चाहत्यांना जराही कल्पना नव्हती.

प्रचंड संघर्ष करुन बॉलीवूडमध्ये स्वताची वेगळी ओळख निर्माण केलेल्या नवाझुद्दीनवर त्याच्या पत्नीनं बलात्काराचे आरोप केले होते. याशिवाय तो एक बेजबाबदार पालक असून त्यानं आपल्याशी गैरवर्तन केले आहे. या कारणांमुळे आलियानं त्याच्यापासून घटस्फोटाचा निर्णय घेतला होता. याला आणखी एक कारण म्हणजे नवाझुद्दीनची आई आणि आलिया यांच्यातील भांडणं. आलिया सून म्हणून नवाझुद्दीनच्या आईनं कधीही स्विकार केला नसल्याचे आलियानं सांगितलं आहे.

Also Read - जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

आता आलियानं नवाझुद्दीनच्या विरोधात थोडी नरमाईची भूमिका घेतली आहे. मात्र त्यासाठी तिनं काही अटीही ठेवल्या आहेत. करिअरच्या ऐन यशाच्या वाटेवर असताना नवाझुद्दीनच्या बाबत असे काही व्हावे हे त्याच्यासाठी मोठी धक्कादायक बाब असल्याचे समोर आले आहे. अशातच नवाझुद्दीनचा भाऊ शमास यांनी देखील नवाझुद्दीनची बदनामी केली होती. त्यामुळे नवाझुद्दीन संतापला होता.

तुम्ही सोशल मीडियावर जे काही वाचता आणि पाहता आहात ते सारं सत्य आहे असे समजण्याची चूक करु नका. पत्नी आणि भाऊ यांच्या आरोपामुळे नवाझुद्दीननं त्यांच्यावर शंभर कोटीचा मानहानीचा दावाही ठोकला होता. कोर्टानं देखील नवाझुद्दीन आणि त्याची पत्नी आलिया यांना मुलांसाठी माघार घेण्याचा सल्ला दिला होता. अशातच दोघांकडून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. नवाझुद्दीनसमोर पत्नी आलियानं काही अटी ठेवल्या आहेत.

आलियाचे म्हणणे आहे की, मुलांसाठी आम्ही एकत्र येऊ पण त्यासाठी नवाझुद्दीननं माझ्यावर आणि शमासवर जो शंभर कोटींचा गुन्हा दाखल केला आहे तो त्यानं मागे घ्यावा. तसेच भविष्यामध्ये मुलांचे आरोग्य आणि शिक्षणाची जबाबदारी देखील त्यानं घ्यायला हवी. तशी हमी मला लेखी स्वरुपात मिळाली तर मी पुन्हा त्याच्यासोबत संसाराला सुरुवात करेन. अशा प्रकारची माहिती आलियाचे वकील रिजवान सिद्धिकी यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळानं उडता तीर अंगावर घेतलाय, ज्यांच्या तुकड्यावर जगलात त्यांनाच....; अजितदादांच्या शिलेदरांची राजन पाटलांना वॉर्निंग

Viral Photo : विकी कौशल–कतरिनाच्या बाळाचा फोटो व्हायरल? चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण; खरं काय ते समोर आलं

Nagpur Bribe : नागपूर पोक्सो प्रकरणात महिला पोलिस तपास अधिकारीने साक्षीदाराला धमकावत मागितली लाच!

Yeola News : 'शिक्षक द्या शिक्षक!' हवालदार वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; पालकांसह थेट पंचायत समिती गाठली

Latest Marathi Breaking News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यात थंडीची तीव्रता वाढणार

SCROLL FOR NEXT