Nawazuddin Siddiqui Avneet kaur romance esakal
मनोरंजन

Nawazuddin Siddiqui : 'शाहरुखनं केलं तर रोमान्सचा बादशाह, मी केलं तर वय झालं'...असं कसं?

सोशल मीडियावर या चित्रपटाचा ट्रेलर व्हायरल झाला. त्यानंतर नवाझुद्दीन हा चर्चेत आला.

सकाळ डिजिटल टीम

Nawazuddin Siddiqui defends romantic pairing kissing : बॉलीवूडची क्वीन कंगना रनौतच्या मणिकर्णिका या प्रॉडक्शन हाऊसतर्फे प्रसिद्ध अभिनेता नवाझुद्दीन आणि अवनीत कौरचा नवा चित्रपट येतो आहे. त्याचे नाव टीकू वेड्स शेरु असे आहे. गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट सोशल मीडियावर ट्रेंडिंगचा विषय असल्याचे दिसून आले आहे.

सोशल मीडियावर या चित्रपटाचा ट्रेलर व्हायरल झाला. त्यानंतर नवाझुद्दीन हा चर्चेत आला. नवाझुद्दीननं त्याच्याहून अर्ध्या वयाच्या अभिनेत्रीसोबत लिपलॉक सीन दिल्यानं तो वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. नेटकऱ्यांनी त्याला धारेवर धरले. तुझं वय काय, तू दिसतो कसा आणि लिपलॉक सीन देतोस. अशा प्रकारची टीका नवाझुद्दीनवर करण्यात आली होती.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

यासगळ्यावर अभिनेत्यानं नेटकऱ्यांना जशास तसे उत्तर दिले आहे. यावेळी त्यानं आपली बाजू मांडताना बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानच्या नावाचा दाखल दिला आहे. टीकू वेडस् शेरुमध्ये नवाझुद्दीननं २१ वर्षांच्या अवनीतसोबत काही इंटिमेट सीन दिले आहेत. ज्यामुळे तो चर्चेत आला आहे. नेटकऱ्यांना नवाझुद्दीनचा कमालीचा राग आला आहे.

नवाझुद्दीन आणि अवनीत यांच्या वयामध्ये तब्बल २५ वर्षांचे अंतर आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी अभिनेत्यावर टीका केली होती. त्याचे काही मीम्स देखील व्हायरल झाले होते. इंडिया टूडेला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये नवाझुद्दीननं म्हटलं आहे की, मला एक गोष्ट कळत नाही ती म्हणजे लोकं कशावरुनही वाद का तयार करत असतात, आता ज्या गोष्टीवरुन वाद होतो आहे त्याला काही अर्थ आहे का, लोकांना नेमकी अडचण काय आहे हे कळत नाही.

रोमान्स या गोष्टीचा वयाशी काय संबंध, मुद्दा हा आहे की, आताच्या तरुणाईकडे रोमान्ससारख्या कोणत्याही गोष्टी राहिलेल्या नाही. आमच्या काळात रोमान्स म्हणून ज्या गोष्टी होत्या, त्याची गोष्ट वेगळी होती. तुम्ही प्रेमाचा हा शारीर पातळी सोडून विचार करायला मागत नाही. त्यात अडकून पडता आणि त्यानंतर समस्यांना सुरुवात होते.

शाहरुख खान या वयातही रोमँटिक भूमिका करतो. त्या प्रेक्षकांना आवडतातही. त्यांनी तशा भूमिका करणे पसंद केले आहे किंवा त्याला प्रतिसाद मिळतो आहे त्याचे कारण तरुणाईकडे रोमान्स राहिलेला नाही. आणि आजच्या तरुणाईला रोमान्स नावाची गोष्टच माहिती नाही. म्हणून शाहरुखच्या रोमँटिक भूमिकेला न्याय मिळतो.

आजकाल तुम्हाला सगळे व्हाट्स अपवर मिळते. ब्रेक अपची बातमीपण तुम्हाला त्यावरच येते. अशावेळी रोमँटिकपणा काय असणार, असा प्रश्नही नवाझुद्दीननं यावेळी ट्रोल करणाऱ्यांना केला आहे. नवाझुद्दीन आणि अवनीतची प्रमुख भूमिका असणारा टीकू वेड्स शेरु हा २३ जून रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: पेपर लीकविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'चा एल्गार! आंदोलनासाठी परवानगी कशी मिळते? जाणून घ्या प्रक्रिया

Diesel Selling : कॅनमध्ये डिझेल विक्रीला बंदी; व्यावसायिकांसह वाहनचालकांची गैरसोय

Bhor News : माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन

Hero HF Deluxe : पेट्रोलची चिंता संपणार? नितीन गडकरींची मोठी भेट; भारतात पहिल्या Flex Fuel बाईकची एन्ट्री, किंमत 72 हजारपासून सुरू

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT