Nawazuddin Siddiqui Birthday news a girl once rejected him actor reveal truth sakal
मनोरंजन

Nawazuddin Siddiqui Birthday: आज तिला पाच सहा मुलं आहेत.. नवाझने सांगितली पहिल्या प्रेमाची गमतीशीर आठवण..

अभिनेता नवाजउद्दीन सिद्दीकीचा आज वाढदिवस, त्या निमित्ताने हा किस्सा..

नीलेश अडसूळ

Nawazuddin Siddiqui Birthday: अत्यंत प्रतिकूल प्रतिस्थितीतुन संघर्ष करत आज यशाचं शिखर गाठणाऱ्या अभिनेता नवाझुद्दीन सिद्दिकीचा आज वाढदिवस. नवाझने आपल्या अभिनयाने अक्षरशः चाहत्यांना भुरळ घातली आहे.

आज जरी त्याने हे यश मिळवलं असलं तरी एकेकाळी त्याच्या घरात टीव्ही नाही म्हणून त्याला मुलीकडून नकार मिळाला होता. त्याच दिवशी नवाझने टीव्हीमध्ये काम करण्याचा पण केला होता आणि तो त्याने पूर्णही केला. नेमकं काय घडल होतं ते सांगणारा हा किस्सा...

(Nawazuddin Siddiqui Birthday news a girl once rejected him actor reveal truth)

एका मुलाखतीत नवाझने हे सांगतिले होते. तो म्हणाला, 'उत्तर प्रदेशातील बुढाना या छोट्याशा गावात मी राहात होतो. त्यावेळी आमच्याकडे टीव्ही नव्हता. पण गावात ज्यांच्याकडे टीव्ही होता त्यांच्याकडे 'ती' कृषी दर्शन पाहायला जायची.'

'तेव्हा जाताना, माझ्याशी बोल असं मी तिला सांगायचो. पण ती कधीच माझ्याशी बोलली नाही. तेव्हा तिला माझ्यापेक्षा टीव्ही जास्त महत्वाचा वाटला असावा. तेव्हा तआय गोष्ट कुठेतरी मनात राहिली आणि त्याचवेळी ‘एक दिन तुझे मै टीव्ही पे आ कर दिखाऊंगा’ असा पण केला.'

पुढे नवाझ (Nawazuddin Siddiqui) म्हणाला, 'मुंबईमध्ये आल्यावर मी पहिल्यांदा एक मालिका केली. तेव्हा मला आठवलं की मी एका मुलीला वचन दिलं होतं की एक दिवस तुला याच टीव्हीवर येऊन दाखवेन. ते आठवलं आणि मी लगेच माझ्या गावातील मित्राला फोन केला.'

' त्याला सांगितलं की तु त्या मुलीशी बोल. तू तिला सांग.. की मी उद्या टीव्हीवर दिसणार आहे. एक दिवस मी टीव्हीवर येईन असं सांगितलं होतं तिला. उद्या माझा कार्यक्रम आहे टीव्हीवर, हे तिला कळव असा निरोप दिला.'

'त्यावेळी समोरून बोलणारा मित्र म्हणाला, अरे तिचं लग्न झालंय आणि तिला पाच सहा मुलं आहेत. ज्या व्यक्तीशी तिचं लग्न झालंय तो तिला टीव्ही तर पाहू देत नाहीच शिवाय घराबाहेरही पडू देत नाही,' अशी आठवण नवाझने सांगितली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT