Nawazuddin Sidhiqui  esakal
मनोरंजन

Nawazuddin Sidhiqui : 'तो जसा दिसतो तसा नाही, त्याची नियत...भावानंच नवाझुद्दीनची केली पोलखोल!

गेल्या काही दिवसांपासून नवाझुद्दीनचे ग्रह फिरल्याचे दिसून येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Nawazuddin Siddiqui Bollywood actor : कभी कभी लगता है अपुनच भगवान है....सेक्रेड गेम्समध्ये ज्या दमदारपणे गणेश गायतोंडेची भूमिका करणाऱा नवाझुद्दीन डायलॉग बोलतो तेव्हा तो प्रेक्षकांचा होऊन जातो. गेल्या काही दिवसांपासून नवाझुद्दीनचे ग्रह फिरल्याचे दिसून येत आहे. त्याच्या पत्नीनं त्याच्यावर केलेले आरोप नवाझुद्दीनच्या चाहत्यांसाठी धक्कादायक आहे.

आता नवाझुद्दीनच्या भावानं शमासनं देखील त्याची पोलखोल केली आहे. गेल्या काही दिवसांपासून नवाझुद्दीन भलत्याच संकटात सापडला आहे. त्याची पत्नी, मग घरकाम करणारी महिला यासगळ्यांनी त्याच्यावर केलेले आरोप धक्कादायक आहे. नवाझुद्दीननं पत्नी आलियाचा शाररिक, मानसिक त्रास दिल्याचे तिचे म्हणणे आहे. यासगळ्यात आलिया आणि सासू यांच्यातील भांडणंही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.

Also Read - कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

नवाझुद्दीनची आई तर आलियाला आपली सून मानायला तयार नाही. नवाझुद्दीनला पत्नीपासून घटस्फोट हवा आहे. काही दिवसांपूर्वी त्यानं मुलांची कस्टडी मिळावी म्हणून कोर्टाकडे अर्जही केला होता. यावर कोर्टानं त्यांना तुमच्यातील भांडणं आपआपसात चर्चा करुन सोडवा, तुमच्या मुलांकडे पाहा असं कोर्टानं सांगितलं होतं. त्यानंतर आलियानं नवाझुद्दीनवर बलात्काराचाही आरोप केला आहे.

यासगळ्यात नवाझुद्दीनच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. मोठ्या संघर्ष आणि मेहनतीनं आपली स्वताची वेगळी ओळख निर्माण केलेल्या नवाझुद्दीनवर होत असलेले आरोप चाहत्यांसाठी वेदनादायी आहेत. अशातच त्याच्या भावानं शमासनं आणखी वेगळ्या गोष्टींचा खुलासा आहे. त्यामुळे पुन्हा नवाझुद्दीनची डोकेदुखी वाढल्याचे दिसून येत आहे. शमासनं इ टाईम्सशी बोलताना काही गोष्टींबाबत खुलासा केला आहे.

शमास म्हणाला, नवाझ हा माझा भाऊ आहे आणि आलिया ही माझी मैत्रीण आहे. त्यांच्यात जेव्हा भांडणं व्हायची तेव्हा ती सोडवण्याचे काम मी करायचो. त्यांच्यातील वाद वाढू नये यासाठी मी प्रयत्न केले आहेत. मला वाटतं, एक महिला म्हणून आलियानं खूप काही सहन केले आहे. मी नंतर नवाझुद्दीनसोबत काम करणं सोडून दिलं. त्यांच्या नात्यातील गोष्टी या कालांतरानं सार्वजनिक होऊन गेल्या. मग मी त्याच्याशी बोलणंही बंद केलं.

नवाझला माझ्या चित्रपटामध्ये मला घ्यायचे नव्हते. त्याच्यामुळे आमच्यातील नाते खराब झाले असते. त्याची इच्छा होती की, मी त्याच्यासाठी काम करावे. मात्र जेव्हा एका निर्मात्यानं त्याला कास्ट करण्याचा निर्णय घेतला तेव्हा माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नव्हता. मला तो नेहमीच हावरट वाटला. तो जसा दिसतो तसा नाही. त्याची नियत ही बऱ्याचदा बदलत राहिली.

सुरुवातीच्या काळात त्यानं मित्रांसाठी त्यांच्या प्रोजेक्टमध्ये फ्रीमध्ये काम केले होते. मात्र आता तो मोठा स्टार झाल्यानंतर त्यांनी सगळ्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आमच्या नात्यात कटूता आली. आता लोकांना कळतं आहे की,त्याच्यामध्ये किती गर्व आहे. नवाझनं कोर्टामध्ये घटस्फोटासाठी कोणती कागदपत्रं दिली आहेत याविषयी काही माहिती नाही. ती मुलं नवाझुद्दीनची नाही. असा आरोप नवाझुद्दीनच्या आईनं आलियावर केला होता यावर शमासनं सांगितलं की, तसं नाही नवाझुद्दीन आपल्या मुलांच्याबाबत असं काही सहन करणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray visits Meenatai Thackeray statue : उद्धव ठाकरेंनी केली मीनाताईंच्या पुतळ्याची बारकाईने पाहणी अन् म्हणाले ‘’या मागे दोनच व्यक्ती…’’

Uddhav Nimse : मुंबई हायकोर्टाकडूनही जामीन नाकारला: उद्धव निमसे अखेर पोलिसांपुढे शरण

Navratra and Overthinking Tips: मन गोंधळले असेल तर नवरात्रीचे ९ दिवस देतील नवा आधार! अशी करू शकता ओव्हरथिंकिंगवर मात

Jalaj Sharma : जिल्हाधिकारी जलज शर्मांची मोठी घोषणा: नाशिकमधील गड-किल्ले होणार स्वच्छ

राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते उपेंद्र लिमये यांनी 'सुपर डान्सर चॅप्टर ५' मध्ये आदितीला दिला खास पाठिंबा

SCROLL FOR NEXT