Nawazuddin Siddiqui Saidhav movie accident esakal
मनोरंजन

Nawazuddin Siddiqui : अपघातातून नवाझुद्दीन थोडक्यात बचावला! 'सैंधव' च्या शुटींगच्या दरम्यान घडली घटना

आपल्या वैशिष्टयपूर्ण अभिनयानं नेहमीच चाहत्यांच्या पसंतीचा अभिनेता राहिलेल्या नवाझुद्दीनच्या आगामी चित्रपटाची उत्सुकता आहे.

युगंधर ताजणे

Nawazuddin Siddiqui Saidhav movie accident : आपल्या वैशिष्टयपूर्ण अभिनयानं नेहमीच चाहत्यांच्या पसंतीचा अभिनेता राहिलेल्या नवाझुद्दीनच्या आगामी चित्रपटाची उत्सुकता आहे. नवाझुद्दीन हा आता शैलेश कोलानूच्या सैंधव नावाच्या तेलुगू चित्रपटातून डेब्यू करणार आहे. त्याच्याविषयीची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

सोशल मीडियावर नवाझुद्दीन बाबतची ती घटना व्हायरल झाली आहे. त्या अपघातातून नवाझुद्दीन थोडक्यात बचावल्याचे सांगण्यात येत आहे. अमर उजालानं याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे. त्या वृत्तानुसार, सैंधवमध्ये नवाझुद्दीन हा विकास मलिक नावाची भूमिका साकारत आहे. त्यामध्ये त्यानं नकारात्मक भूमिका साकारत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेमध्ये त्यानं या चित्रपटाविषयी सांगितले आहे.

नवाझुद्दीननं वेंकटेश आणि इतर साऊथच्या कलाकारांसोबत काम करण्याविषयीचा अनुभवही सांगितला आहे. त्यावेळी तो म्हणाला या चित्रपटाचे शुटींग करत असताना त्याला एका अपघाताला सामोरं जावं लागले होते. त्याचं झालं असं की, आम्ही श्रीलंकेत शुटींग करत होतो. समुद्रातील त्या एका प्रसंगामध्ये मी माझ्या बोटीतून पाण्यात पडलो. त्या लाटेनं माझ्या बोटीला जोरदार तडाखा दिला होता.

सुदैवानं मला कोणतीही इजा झाली नाही. हा सगळा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तो सीन छान शुट झाला. मला आशा आहे की, दिग्दर्शकांना तो सीन आवडला असेल. अशा शब्दांत नवाझुद्दीनं त्या घटनेविषयी सांगितल्या आहेत. यावेळी नवाझुद्दीननं वेंकटेशसोबत काम करण्याच्या अनुभवाविषयी सांगितले आहे. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले. तमिळमधून चित्रपट करताना खूप आनंद झाला. अशा शब्दांत त्यानं त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सैंधव या चित्रपटासाठी तेलुगू भाषेचे धडे गिरवले आहेत. मला डबिंगविषयी प्रॉब्लेम होता. त्यामुळे ही भाषा शिकण्याचा मी प्रयत्न केला. त्यात मला काही अंशी यशही आले याचाही आनंद आहे. असे नवाझुद्दीननं यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMFBY: एल निनोचा इशारा! अवकाळी पाऊस असो वा दुष्काळ; शेतकऱ्यांना लाखोंची नुकसानभरपाई देतो हा विमा

IPL 2027 Trade Update: महेंद्रसिंग धोनी CSK चा नवा प्रशिक्षक? स्टीफन फ्लेमिंगबाबत नवे अपडेट्स, हार्दिक पांड्या...

Oracle Layoffs : AI ने हिसकावली रोजी रोटी ! ओरॅकलने २१ हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, भविष्यातही नोकऱ्यांवर येणार गंडांतर

Nagpur: चिखलातून वाहने चालविण्यासाठी व्हा सज्ज!; पावसाळा तोंडावर अन् रस्त्यांची चाळण; वाहनचालकांसमोर अडचणींचा डोंगर

Latur News: लातूर जिल्ह्यास मोठा दिलासा; अहमदपूर-उदगीर रस्त्याचा रखडलेला प्रश्न मार्गी, ३०० कोटी मंजूर, आ. संजय बनसोडेंच्या प्रयत्नांना यश

SCROLL FOR NEXT