nawazuddin siddiqui and aaliya siddiqui  Sakal
मनोरंजन

Nawazuddin Siddiqui सोबतच्या वादात पत्नी आलियाच्या अडचणी वाढल्या! जवळच्याच व्यक्तीनं केला गुन्हा दाखल..

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. त्याची पत्नी आलिया ही त्याच्यावर सतत काही ना काही आरोप करत आहे. तिने नवाजवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

कुटुंबावर घरगुती हिंसाचाराचे आरोपही तिने केले आहेत. तिनं यासंदर्भात अनेक व्हिडिओही शेअर केले होते. ज्यात तिनं नवाज तिला कशाप्रकारे वाईट वागणुक देत आहे हे दाखविलं तर नवाजनेही या आरोपांवर मौन सोडलं . नवाजनेही पत्नीचे आरोप फेटाळून लावले आणि ते निराधार असल्याचे म्हटले

त्यानेही आलिया त्याला पैशांसाठी बॅकमेल करत असल्याचा आरोप केला आता यातच आता आलियाच्या अडचणी वाढल्याचं दिसतयं. आलियाची जवळची मैत्रिण मंजू गढवाल हिने तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मंजू गढवाल हिने आलियावर गंभीर आरोप केले आणि सांगितले की तिने मंजूकडून लाखो रुपये उसने घेतले होते, जे ती आता परत करत नाही आहे. मंजू म्हणाली, 'आलियाने चार वर्षांपूर्वी माझ्या आई-वडिलांकडून चित्रपट करण्यासाठी ५० लाख रुपये घेतले होते. आता इतकी वर्षे उलटून गेली तरी ती रक्कम परत करण्याचे नाव घेत नाही.'

आलियाने माझ्या कुटुंबाकडून २७ लाख रुपये उसने घेतले होते. एवढेच नाही तर त्यांनी चित्रपटाच्या निर्मात्याला अद्याप सात लाख रुपये परत केलेले नाहीत. असाही आरोप तिनं केला आहे.

आलिया बऱ्याच दिवसांपासून नवाजवर वेगवेगळे आरोप करत होती, ज्यावर नवाजने कधीच भाष्य केले नाही. नवाजच्या या निर्णयावर तिचे चाहते तेव्हापासून इंडस्ट्रीतील सर्व स्टार्सही एकत्र आले. इतकेच नाही तर अभिनेत्री कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर नवाजच्या समर्थनार्थ एक पोस्टही शेअर केली आहे. आता त्यातच आलियावर जवळच्या मैत्रणिनेही आरोप केल्याने आता या प्रकरणाला वेगळं वळणं येणार असल्याचं दिसतयं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishalgad Qurbani Permission : किल्ले विशाळगडावर उरुस काळात सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देण्यास बंदी; मांसाहार नेण्याबाबत कोर्टाचा काय आहे आदेश?

Vishnu Sahasranama: अधिक मासात विष्णू सहस्त्रनामाचा जप का करतात? रोजही वाचण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत आयपीएल क्रिकेट बेटिंग प्रकरणी भाजपच्या नगरसेवकाला अटक

Pargaon News : अष्टविनायक महामार्गावर अनेक ठिकाणी डांबर उखडून पडले खड्डे; तर महामार्गावरील अनेक बसथांब्यांची दुरावस्था झाली आहे

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

SCROLL FOR NEXT