Nawazuddin Siddiqui  esakal
मनोरंजन

Nawazuddin Siddiqui : 'मुलांकडं पहा, भांडण थांबवा'! कोर्टानं नवाझुद्दीनला सुनावलं

आता हायकोर्टानं नवाझुद्दीन आणि त्याची पत्नी या दोघांनाही सुनावलं आहे. नवाझुद्दीन हा बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे.

सकाळ डिजिटल टीम

Nawazuddin Siddiqui wife Aliya high court instruction : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता नवाझुद्दीन सिद्धीकी हा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची आणि त्याच्या पत्नीची भांडणं हा सोशल मीडियावर चर्चेत आलेला मुद्दा आहे. नवाझुद्दीनच्या पत्नीनं आलियानं त्याच्यावर कौटूंबिक हिंसाचाराचा आरोप केला आहे. यामध्ये नवाझुद्दीनच्या आईच्या तक्रारीचाही समावेश आहे.

आता हायकोर्टानं नवाझुद्दीन आणि त्याची पत्नी या दोघांनाही सुनावलं आहे. नवाझुद्दीन हा बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. त्याला इंस्टावर फॉलो करणाऱेही हजारो आहेत. अशावेळी त्याच्याबाबत घडलेल्या त्या प्रसंगानं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या पत्नीनं अभिनेत्यावर अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. कोर्टानं त्यांची कानउघाडणी केली आहे.

Also Read - जाणून घ्या काॅन्ट्रा फंडातल्या गुंतवणुकीबाबत

नवाझुद्दीन आणि त्याच्या पत्नीचा वाद कोर्टापर्यत गेला आहे. कोर्टानं त्यांना काही गोष्टींबाबत परखडपणे सुनावले आहे. कोर्ट म्हणाले, तुम्ही तुमच्या मुलांचा विचार करावा. तुमच्यातील भांडणं आणि त्यामुळे त्यांच्यावर होणारा परिणाम याबाबत विचार करा. भांडू नका. मुलांसाठी भांडणं सोडून एकत्र या. नवाझुद्दीननं काही दिवसांपूर्वी हॅबियस कॉर्पस अंतर्गत याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये त्यानं आपली बारा वर्षाची मुलगी आणि सात वर्षांच्या मुलीबाबत माहिती पत्नीनं द्यावी यासाठी कोर्टाकडे मागणी केली आहे.

त्यावर न्यायाधीशांनी नवाझुद्दीन आणि त्याची पत्नी यांना मुलांसाठी काही गोष्टींचा पुन्हा बारकाईनं विचार करण्यास सांगितले आहे. तुमच्यातील भांडणं मिटविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असेही कोर्टानं सुनावलं आहे. सिद्धीकी आपल्या मुलं आणि शिक्षण यांच्यासाठी अधिक सजग असल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT