Naxalite to become hero, Trupti Bhoir's special step for upcoming film kurmaghar SAKAL
मनोरंजन

Trupti Bhoir: नक्षलवादी बनणार हिरो, तृप्ती भोईरचं आगामी सिनेमासाठी धाडसी पाऊल, हा आहे विषय

कुर्माघर प्रथेवर गडचिरोली जिल्ह्यातील कलावंतांना घेऊन त्या हिंदी चित्रपट तयार करत आहेत

Devendra Jadhav

Trupti Bhoir News: कधीकाळी हातात बंदूक घेत तथाकथित क्रांतीची रक्तरंजित वाट चालणाऱ्या त्यांच्या मुखातून सरकारच्या विरोधात शिव्याच निघत होत्या. पण आता त्याच मुखातून मनाचा ठाव घेणारे फिल्मी संवाद निघणार आहे.

ही कमाल केली आहे टुरींग टॉकीज, अगडबंब फेम तृप्ती भोईर यांनी. कुर्माघर प्रथेवर गडचिरोली जिल्ह्यातील कलावंतांना घेऊन त्या हिंदी चित्रपट तयार करत आहेत. त्यासाठी त्यांनी शनिवार (ता.२४) आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची ऑडिशन घेतली.

(Naxalite to become hero, Trupti Bhoir's bold step for upcoming film, this is the subject)

गडचिरोली जिल्हा हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल असा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये बहुतांश आदिवासी बांधव हे दुर्गम अतिदुर्गम भागात राहत असून जुन्या रूढीपरंपरेने ते वर्षानुवर्षे आपले जीवनमान जगत आले आहेत.

त्यामध्ये एक अशी परंपरा आहे की, मासीक पाळीच्या दिवसात या भागातील महिलांना घराच्या आत न राहता बाहेर एक छोटे घर बनवलेले असते त्यात राहावे लागते, त्याला कुर्माघर असे म्हणतात.

त्यावर आधारित "कुर्माघर” नामक चित्रपटाची निर्मीती करण्यात येत असल्याने अगडबम, टुरिंग टॉकीज, नमस्कार जयहिंद, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवे अशा अनेक उत्कृष्ट चित्रपटाच्या निर्मात्या तृप्ती भोईर.

तृप्ती भोईर आणि विशाल कपूर यांनी नक्षलवादाचा कठोर मार्ग सोडुन गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केलेल्या आत्मसमर्पितांच्या नवजीवन वसाहत येथे जाऊन विविध पुरुष तसेच महिला आत्मसमर्पित सदस्यांचे चित्रपटाच्या निर्मितीसाठी ऑडिशन घेतले. त्यामध्ये त्यांनी त्यांचे आवाजाचे परिक्षण व मार्गदर्शन केले.

या सिनेमाबद्दल तृप्ती भोईर म्हणाल्या, "कुर्माघर प्रथेवर चित्रपट तयार करताना त्यात गडचिरोली जिल्ह्यातील कलावंतांनाच घ्यावे असा माझा मानस आहे. आता आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची ऑडिशन घेतली आणि त्यात अनेक सक्षम कलावंत गवसले.

या कलाकारांचे भविष्य उज्वल आहे. त्यातून त्यांच्यावरचा नक्षलवादाचा कलंक पुसला जाऊन जिल्ह्याची प्रतिमा उजळण्यास मदत होईल. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांचे खूप खूप आभार."

भविष्यात आत्मसमर्पित सदस्यांना चित्रपट सृष्टित काम करण्याची संधी मिळावी यादृष्टीने पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसमर्पीत नक्षल सदस्यांनी चित्रपटात काम करावे व स्वतःची एक नवीन ओळख निर्माण करावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

तसेच ऑडीशन दरम्यान अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता तसेच आत्मसमर्पण शाखेचे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सागर झाडे व अंमलदार उपस्थित होते.

अभिनेत्री तृप्ती भोईर कुर्माघर प्रथेवर चित्रपट तयार करत आहेत. या चित्रपटात गडचिरोली जिल्ह्यातीलच कलावंत असावे असा निर्धार त्यांनी केला आहे. हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Shakti: शक्ती चक्रीवादळ कुठे पोहोचले? धोका नेमका कधी टळणार? हवामान खात्याकडून तारीख जाहीर

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

SCROLL FOR NEXT