Nayanthara-Vignesh Shivan Wedding: Shah Rukh Khan's pic from Jawan co-star's nuptials goes viral Google
मनोरंजन

नयनताराच्या लग्नात पोहोचला शाहरुख, ३ दिवस आधी होता Covid-19 पॉझिटिव्ह

शाहरुख नयनतारासोबत दिग्दर्शक एटलीच्या 'जवान' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचा नुकताच फर्स्ट लूक रिलीज झाला.

प्रणाली मोरे

दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतलं प्रसिद्ध कपल म्हणून नयनतारा-विघ्नेश शिवन(Nayanthara-Vignesh Shivan) यांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. नयनतारा आणि विघ्नेश आज ९ जून रोजी महाबलिपूरम येथे एका लक्झरी रिसॉर्टमध्ये लग्न करीत आहेत. लग्नात सामिल होण्यासाठी अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) महाबलिपुरम इथं पोहोचला आहे. ३ दिवस आधी शाहरुख खानला कोरोना(Corona) झाल्याची बातमी होती. आणि तेव्हा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पासून त्याच्या चाहत्यांपर्यंत सर्वांनीच तो लवकर बरा व्हावा म्हणून इच्छा व्यक्त केली होती. आता तीन दिवसांत शाहरुख कोरोनातून बरा झाला असल्याची बातमी आहे. आणि त्यानं नयनताराच्या लग्नात घेतलेल्या रॉयल एन्ट्रीची चर्चा सुरू झाली आहे.(Nayanthara-Vignesh Shivan Wedding: Shah Rukh Khan's pic)

नयनतारा आणि विघ्नेश शिवनच्या वेडिंग व्हेन्यू मधून शाहरुख खानचे काही फोटो समोर आले आहेत. ज्यात तो खूपच हॅंडसम दिसत आहे. शाहरुख नयनतारासोबत एटलीच्या 'जवान' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचा नुकताच फर्स्ट लूक रिव्हिल झाला. शाहरुखचे चाहते मात्र त्याला या अंदाजात पाहून खूपच खूश आहेत. तीन दिवस आधीच शाहरुखला कोव्हिड झाला होता आणि आता तो त्यातून बरा झाला आहे हे पाहून देखील चाहत्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही.

शाहरुख खान काही दिवसांपूर्वी करण जोहरच्या ५० व्या वाढदिवसाला हजर राहिला होता. त्या पार्टीत जवळपासर अर्धअधिक बॉलीवूड सामावलं होतं. आणि या पार्टीनंतर दोनच दिवसांत शाहरुखला कोरोना झाल्याची बातमी समोर आली,तर कतरिना कैफला देखील कोरोना झाल्याचं कळलं. शाहरुखसोबतच बोनी कपूर,साऊथ सुपरस्टार रजनीकांत आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील मान्यवर नयनतारा-विघ्नेशच्या लग्नाला उपस्थित राहिले आहेत.

लग्नासाठी नयनतारा आणि विघ्नेशनं एक लक्झूरियस रिसॉर्ट बूक केला आहे. बोललं जात आहे की लग्नानंतर याच रिसॉर्टमध्ये वेडिंग रिसेप्शनही पार पडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT