Nayanthara Vignesh esakal
मनोरंजन

Nayanthara Vignesh :नयनतारा-विग्नेशचा मोठा गौप्यस्फोट...

लग्नाच्या अवघ्या चार महिन्यातच मुलं कसे? यावर दिले स्पष्टीकरण...

सकाळ डिजिटल टीम

दाक्षिणात्य जोडपं नयनतारा आणि विग्नेश शिवन यांनी आपण आई बाबा झाल्याची माहिती दिली आणि एकच चर्चा सुरु झाली. या जोडीनं  जून २०२२ मध्ये लग्नं केलं. मग लगेच ऑक्टोबर २०२२ मध्ये ते जुळया मुलांचे पालक कसे झाले असा प्रश्न उपस्थित झाला. त्यामुळे त्याना सरोगसीच्या मार्गाने हे मुलं झाली असावी असा अंदाज लावण्यात आला. त्याबाबत नयनतारा आणि विग्नेशने काही खुलासा केला नव्हता. त्यामुळे त्याच्यावर सरोगसी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले.

 तामिळनाडूचे आरोग्य मंत्री सुब्रमण्यम यांनी वैद्यकीय सेवा संचालनालयातर्फे याप्रकरणी जोडप्याकडून स्पष्टीकरण मागविले होते. त्यामुळे याबाबत स्पष्टीकरण देतांना नयनतारा आणि विग्नेश यांनी सहा वर्षापूर्वीच रजिस्टर्ड लग्न झाल्याचे उघड केले आहे. याबाबत नयनतारा आणि विग्नेशने तामिळनाडूच्या आरोग्य विभागाकडे एक एफिडिवेट जमा केलंय. हा पुरावा सादर करुन त्यांनी सर्व उपस्थित प्रश्नांवर पडदा टाकला आहे.

म्हणजेच या जोडप्याचं लग्न जून २०२२ मध्ये नाही तर सहा वर्षापूर्वीचं झालं होतं. त्यांनी ही माहिती लपवली होती. मात्र मुलांच्या जन्मानतंर अनेक प्रश्न उपस्थित झाल्याने ते कोंडीत सापडले आणि त्यांना हे सत्य उघड करावं लागलं.

 सरोगसी कायदा काय सांगतो? जर एखाद्या  विवाहित जोडप्याला लग्नाच्या ५ वर्षापर्यंत  स्वत:चं मूल होऊ शकत नसेल किंवा वैद्यकीय स्थितीमुळे जोडप्याला मुलं जन्मास घालण्यास अडचण असेल तेव्हा सरोगसी पर्याय असतो. नयनतारा आणि विग्नेशच लग्न ६ वर्षापूर्वी झाल्याने ते सरोगसीद्वारे पालक होऊ शकतात हे त्यांनी सिध्द केल आहे. त्यानी कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केलेले नाही, त्यामुळे आता त्यांना अजून काही स्पष्टीकरण देण्याची गरजचं नाही. नयनतारा आणि विग्नेश यांच्या जुळया मुलांना दुबईत राहणाऱ्या एका मल्याळी महिलेने सरोगसीद्वारे जन्म दिल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गांधीजींनी २१ दिवस उपोषणात लिंबू तर सोनम सरांनी २६ दिवस फक्त...; अभिजीत दीपकेचा मोठा खुलासा

Abhijeet Dipke on Jai Bhim : 'जय भीम' हा नारा केवळ एका समाजाचा नाही; अभिजीत दिपके यांचे वक्तव्य, 'ब्लॅक अँड व्हाईट'मध्ये अनेक खुलासे

Anna Bhau Sathe Jayanti : कोणतेही औपचारिक शिक्षण नाही, तरीही रचला इतिहास! डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा अन् अण्णा भाऊंच्या प्रतिभेचा असा होता संगम

Latest Marathi News Live Update : अमित शहांचा पुणे दौरा, आंदोलनाआधी काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

Abhijit Dipake: योगी, मोदी, BJP आयटी सेलचे लोक शिवीगाळ करतात, त्यांच्यावर FIR का नाही? अभिजीत दिपकेंचा सवाल

SCROLL FOR NEXT