मनोरंजन

'आरोप करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे'; क्रांती रेडकर संतापल्या

एनबीसीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी धक्कादायक आरोप केले होते.

युगंधर ताजणे

मुंबई - एनबीसीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी धक्कादायक आरोप केले होते. त्यात आर्यन खान प्रकरणातील प्रमुख पंच प्रभाकर साईलनं आपल्याला वानखेडे यांना देण्यासाठी पैसे दिले होते असा खुलासा करुन नवीन चर्चेला तोंड फोडले होते. याशिवाय समीर वानखेडे यांचा धर्म, त्यांचे नाव, त्यांचे पहिले लग्न यासारख्या अनेक गोष्टींना यावेळी मलिक यांनी समोर आणल्या त्या आरोपांना उत्तर देण्यासाठी वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यातून त्यांनी त्या आरोपाचे खंडन केले होते.

क्रांती रेडकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मलिक यांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. त्या म्हणाल्या, आतापर्यत जे आरोप माझ्या पतीवर आणि आमच्या कुटूंबावर करण्यात आले आहे ते सिद्ध करावे. त्यासाठी कोर्टात जावे. मुळातच ज्यांनी आरोप केले आहेत त्यांनी आपण कोण आहोत याचाही विचार करावा. त्यांनी ज्यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतली होती तेव्हा गोपनीयतेची शपथही घेतली होती. याचा त्यांना विसर पडला आहे. गेल्या काही दिवसांपासुन जे काही सुरु आहे त्यामुळे आम्हाला मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रास झाला आहे. माझ्या पतीवर करण्यात आलेल्या आरोपांना काहीही अर्थ नाही. जे आरोप करत आहेत त्यांनी थोडीतरी लाज बाळगावी. अशा शब्दांत क्रांती रेडकर यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

वानखेडे यांच्या भगिनी यास्मिन यांनी देखील काल पत्रकार परिषदेमध्ये मलिक यांच्यावर सडकून टीका केली होती. एखादा मंत्री अशा बेजबाबदार पद्धतीनं आरोप करतो याला काही अर्थ आहे का, याचा सर्वांनी विचार करण्याची गरज आहे. आतापर्यत त्यांना आमच्याकडून ज्या प्रश्नांची उत्तरं हवी होती ती त्यांना दिली आहे. त्यामुळे त्यांनी जे आरोप सुरु केले आहेत त्यांना कसलाच आधार नसल्याचेही त्यांनी सांगितले होते. दरम्यान मलिक यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन आपल्याकडे आणखी काही पुरावे आहेत आणि ते आपण लवकरच सगळ्यांसमोर आणणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : 'काही तरी प्लॅनिंग सुरूय...' वडिलांना आधीच सावध केलं होतं; प्रदीप पूर्णेकर यांच्या मुलाचा मोठा दावा

Apple Pay आता भारतात सुरू; Axis Bankच्या कार्डधारकांना मिळणार सुविधा, जाणून घ्या कसं वापराचं

‘सारेगमप’चं शूटिंग संपवून ट्रेनने घरी निघाले, अन् पहिले पीरियड्स आले'; श्रेया घोषाल आठवण सांगत म्हणाली, 'वडिलांनी पॅड आणलं आणि..'

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

Uttarakhand: स्कूटी चालवून महिला कमावताहेत २० हजार रुपये! फ्लिपकार्ट, मिंत्रा ते ब्लिंकिट-स्विगीमध्ये संधी

SCROLL FOR NEXT